"अवेस्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो (सांगकाम्याद्वारेसफाई)
छो (Pywikibot 3.0-dev)
अवेस्तन भाषेच्या मानाने अवेस्तन लिपि ही बरीच मागाहूनची असावी असे दिसून येते या भाषेतील अक्षरे सस्सानियन काळांतील पहलवी लिपीपासून घेतली असावीत असे दिसून येते या लिपीत [[उर्दू]]प्रमाणेच उजवीकडून डावीकडे ओळ वाचावयाची असते. मूळच्या अवेस्तन लिपीसंबंधाची माहिती अद्यापि उपलब्ध नाही. अवेस्ता ग्रंथाचे पहलवीमध्ये रूपांतर सस्सानियन काळांत झाले. त्यावेळी अवेस्ता समजण्याची देखील अडचण पडू लागली होती. अवेस्तावर काही टीकाग्रंथ झाले होते असे दिसते; व अशा प्रकारचे टीकाग्रंथ मुसुलमानी अमदानीत म्हणजे [[ख्रिस्ती]] शकाच्या आठव्या नवव्या शतकांत देखील झाले होते याबद्दल पुरावा सापडतो. पहलवीमध्ये रूपांतर झालेल्या भागांपैकी, संपूर्ण यश्न, विस्परेद, वंदीदाद व इतर थोडा भाग उपलब्ध आहे. अवेस्ताचे शब्दश: भाषांतर व क्वचित् ठिकाणी विवरणार्थ टीपा असे या रूपांतराचे स्वरूप आहे. मूळ अवेस्तांतील वाक्यरचना देखील जशाच्या तशा भाषांतरात ठेवण्याचा प्रयत्‍न करण्यात आला आहे, व ज्या ठिकाणी अशक्य होईल त्या ठिकाणी तेवढे नवीन प्रत्यय निर्माण करण्यात आले आहे. या पहलवी भाषांतरावरून प्राचीन काळी या झरथुष्ट्रांच्या धर्मासंबंधीच्या आपल्या कोणत्या कल्पना होत्या, अवेस्तामधील धर्मविषयक कायद्यांचा तत्कालीन लोक कशाप्रकारे अर्थ लावीत असत, तत्कालीन आचारविचार काय होते यासंबंधीची माहिती मिळते व या दृष्टीने या भाषांतराचे फार महत्त्व आहे. याशिवाय अवेस्तांतील एखाद्या क्लिष्ट शब्दाचा अर्थ या पहलवी रूपांतरावरून समजतो, या दृष्टीनेहि या भाषांतराचे महत्त्व आहे. या भाषांतरात पुष्कळ अशुद्धे व चुका आहेत व त्यात काही काही ठिकाणी विचित्र अर्थ करण्यात आला आहे हे खरे तथापि त्यामुळे त्याचे महत्त्व कमी होत नाही. अवेस्तन वाक्यरचनेबरहूकूम पहलवी भाषांतरांतहि तशीच वाक्यरचना करण्याचा प्रयत्‍न करण्यात आल्यामुळे भाषांतर फार बाजड झाले आहे. [[इ.स. १२००]] च्या सुमारास, धवल नावाच्या एका पारशी पाद्याच्या नेर्योसंघ नावाच्या मुलाने या पहलवी भाषांतराचे संस्कृतमध्ये रूपांतर केले. हे भाषांतर करताना याने हि पहलवी वाक्यरचना संस्कृतमध्ये तशीच ठेवण्याचा प्रयत्‍न केल्याने संस्कृत भाषांतर फार क्लिष्ट झाले आहे संस्कृतांतील संधि-नियमाकडे पूर्ण दुर्लक्ष केलेले आढळते. सुमारे १६००-१८०० च्या सुमारास खोर्द अवेस्ताच्या पहलवी भाषांतराच्या कांही भागांचे अर्वाचीन पर्शुलिपीत रूपांतर करण्यात आले. तसेच १९ व्या शतकात या पहलवी रूपांतराची [[गुजराती भाषा|गुजराती भाषेत]] दोन रूपांतरे झाली व त्यात बरीच चांगली वठली आहेत.
 
त्यानंतर पाश्चात्य यूरोपीय पंडितांनी याकडे लक्ष्य वेधले. अवेस्ता ग्रंथाची मूळ लिपी शिकून त्या ग्रंथाचे भाषांतर करण्याचा पहिला मान अ‍ॅनक्कोटिल डू पेरा या फ्रेंच विद्वानास देणे जरूर आहे. त्याने हिंदुस्थानात येऊन अतिशय संकटात दिवस काढून मोठ्या खटपटीने इराणी भटजीजवळ या ग्रंंथांचेग्रंथांचे अध्ययन केले; त्या ग्रंथाच्या काही प्रती मिळविल्या व त्या धर्मांतील विधींचाही त्याने थोडाफार परिचय करून घेतला. पारीस येथे परत आल्यानंतर त्याने सतत दहा वर्षें या ग्रंथाचे अध्ययन करून १७७१ साली या ग्रंथाचे सटीक भाषांतर केले.
 
या भाषांतरामुळे [[यूरोप]]मध्ये खळबळ उडून गेली. पुष्कळ लोकांनी डू पेराने मिळवलेल्या ग्रंथाच्या खोटेपणाबद्दल शंका प्रदर्शित केली. यामध्ये सर जोन्स हा प्रमुख होता. त्याने डू पेराला मिळालेली प्रत, साफ खोटी असून त्याला पारशांशी चकविले असे प्रतिपादन केले. त्याच्या उलट फ्रान्समध्ये डू पेराला पुष्कळ अनुयायी मिळाले व जर्मनीतील विद्वान क्लूकर याने तर या डू पेराच्या भाषांतराचे रूपांतर करून व त्यात भरपूर माहितीची भर घालून ते पुस्तक प्रसिद्ध केले.
६३,६६५

संपादने