"ह.मो. मराठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४७:
५ जानेवारी २००४ रोजी पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर ‘संभाजी ब्रिगेड'ने हल्ला केला. त्यानंतर हा प्रचार हिंसक वळण घेणार असे भय मला वाटू लागले.
 
[[जेम्स लेन]] नामक तथाकथित इतिहासकाराने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या पुस्तकात म्हटले की, ‘‘[[दादोजी कोंडदेव]] हा महाराजांचा जन्मदाता पिता होता असा ज्योक महाराष्ट्रात सांगण्यात येतो. भांडारकर संस्थेतील ब्राह्मण संशोधकांनीच वरीलप्रमाणे लिहायला लेनला सांगितले असा समज करून घेऊन [[संभाजी ब्रिगेड]]च्या कार्यकत्र्यांनी वरील हल्ला केला होता. दुस-या दिवशी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री [[आर.आर. पाटील]] हे पुण्यात पत्रकार परिषदेत म्हणाले की, समस्त ब्राह्मण समाजाला नजरेसमोर ठेवून ब्राह्मणेतर सर्व जातीतील उच्चशिक्षित तरुणांनी हा हल्ला केला. पुढे [[जेम्स लेन]]चे पुस्तक व तो स्वतः यांची भारताच्या सुप्रीम कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. त्याच किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी एका चॅनेलवरील चर्चेत भाग घेताना संभाजी ब्रिगेडचे वरिष्ठ पदाधिकारी प्रवीण गायकवाड म्हणाले की, २००४ सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोनियांच्या काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळवायच्या होत्या, म्हणून आमचा वापर करून घेण्यात आला आणि नंतर आम्हाला वाऱ्याावरवाऱ्यावर सोडण्यात आले.
 
ब्राह्मण समाजाविषयी किंवा कोणत्याही धर्म-जातीविषयी या प्रकारे हिंसक वातावरण तयार करून त्यावर राजकीय स्वार्थाची पोळी भाजून घेणे ही अनिष्ट प्रवृत्ती आहे. गेल्या दीडशे वर्षांपासून महाराष्ट्रात ब्राह्मणद्वेषाचे वातावरण पद्धतशीरपणे तयार करण्यात येत असून, सध्या त्याचा कळस गाठण्यात येत आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांनी त्यांच्या ‘शिवरायांच्या बदनामीची केंद्रे' या छापील पुस्तिकेत ब्राह्मणांच्या सर्रास कत्तली केल्या पाहिजेत आणि त्या कामी मराठा तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी चिथावणी अगदी उघडपणे दिली आहे.