"बाळाजी विश्वनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ११०:
सन १७१४ आंग्रे - पेशवे यांच्या संयुक्त स्वारीने जंजीरेकर हबशाकडील काही किल्ले स्वराज्यात आणले.
 
सन १७१७ - १८ पेशवा बाळाजी विश्वनाथ आणि हुसैन अली सय्यद यांनी थोरातांचाकोल्हापूरकर संभाजींचा पूर्ण पाडाव केला. गुजरात, खानदेश आदी बादशाही मुलखात मराठ्यांनी छापेमारी आरंभली.
 
सन १७१८ सालच्या अखेरीस पेशवा बाळाजी विश्वनाथ आपला जेष्ठ पुत्र बाजीराव फौजेसह उत्तरेकडील दिल्ली मोहीमेवर रवाना झाले. सय्यद बंधूंनी मदतीबदल्यात पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्याशी स्वराज्याचा मुलूख, मराठ्यांचे चौथाईचे हक्क आदी बाबतच्या शाही सनदा देण्याचा तह केला. सय्यद बंधूंनी पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या साह्याने बादशहा फर्रूखसियरला पदच्युत केले व त्याच्या जागेवर रफिउद्दोरजात बादशहा केले. या सर्व धामधुमीचा फायदा उचलत पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी सय्यद बंधूवर दबाव आणून महाराणी येसूबाईसाहेब आणि राजपरीवार यांची सहीसलामत सुटका करून घेतली. शाही सनदा मिळाल्यानंतर पेशवा बाळाजी विश्वनाथ साताऱ्यास आले. या मोहिमेतील खर्च वजा करून तीस लाख रूपये , शाही सनदा छत्रपती शाहूमहाराजांच्या चरणी पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी अर्पण केले.