४६,५५२
संपादने
No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit |
||
फायदे :
हा चहा भूक वाढविण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, डोकेदुखी थांबविण्यासाठी उपयोगी पडतो. चहाच्या डायबेटिस विरोधी आणि अन्य चांगल्या गुणधर्मामुळे हा चहा शरीरास फारच फायदेशीर ठरतो. त्वचा सुधारण्यासाठी हा फारच उपयुक्त पडतो.बुरंश फुलांच्या हंगामात हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात हा घरोघरी बनविला जातो.
==चहा वेळ==
चहाला कुठलीही वेळ लागत नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, मध्यरात्र आणि अगदी पहाटे सुध्दा चहा प्याला जातो.
मुंबईत तर खास रात्री चहा पिण्याची ठिकाणे आहेत. दक्षिण मुंबई, दादर, परळ, घाटकोपर, बोरिवली, मालाड परिसरात ह्याचा स्वाद घ्यायला मिळतो. अनेक रेल्वे स्थानकाच्या बाहेर हे चहावाले हमखास असतात. हल्ली मेट्रो रेल्वे बांधकाम चालू असल्याने त्या ठिकाणी शेकडो कामगार दिवसरात्र काम करीत असतात त्यांना रात्री चहा लागतो. तेथे मध्यरात्रीपासून सकाळी ४-५ वाजेपर्यंत चहा मिळतो. हे चहावाले सायकलवर चहा विकत असतात.मुंबई शहरात ही चहाविक्रीची उलाढाल एखाद कोटीपर्यंत जाते. रात्रभर चहा विक्रीत प्रत्येक चहावाला एक ते दीड हजार रुपये कमाई करतो. या रात्रीच्या मेहनतीवर अश्या विक्रेतांची घरे चालतात. मुंबई मायानगरी म्हणतात त्याचे प्रत्यंतर ह्यातच सामावलेले आहे.
==संदर्भ==
मुंबई टाईम्स ०३/०२/२०२०.
== बाह्य दुवे ==
|
संपादने