"काळभैरव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
छो (Pywikibot 3.0-dev)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
== पौराणिक कथा<ref name=":0" /> ==
पुराणांच्या मते भैरवाने जन्मल्याबरोबर सर्व देवांचे दमन केले. म्हणून शिवाने त्याला वृक्ष होण्याचा शाप दिला. तोच दमनक वा तातिरी हा वृक्ष होय. त्याची पूजा केल्याखेरीज देवांच्या पूजेचे फल मिळणार नाही, असा [[शिव|शिवाने]] उःशाप दिला. [[ब्रह्मदेव|ब्रह्मदेवाने]] शंकराचा अपमान केल्यावर त्याच्या क्रोधाग्नीतून काळ्या रंगाचा भैरव जन्मला, त्याने ब्रह्‌ग्याचेब्रम्हाचे शिवनिंदा करणारे पाचवे मस्तक तोडले. सर्व तीर्थांना जाऊनही भैरवाचे ब्रह्महत्येचे पाप नष्ट झाले नाही. शेवटी [[काशी|काशीत]] त्याला पापमुक्ती मिळाली व त्याने ब्रह्‌म्याचे मस्तक जेथे ठेवले, तेथे कपालमोचनतीर्थ बनले. कालिकापुराणाच्या मते पार्वतीच्या शापाने महाकाल हा गण भैरवाच्या रूपाने जन्मला, त्याचा जन्म रात्रीच्या चौथ्या प्रहरी झाल्याचे मानले जाते. कार्तिक वद्य अष्टमीला '''भैरवजयंती''' हे काम्यव्रत केले जाते.
 
गळ्यात नरमुंडमाला हातात नरमुंड अंगावर हत्तीचे कातडे [[साप|सापाचे]] दागिने चार, आठ, बारा वा अधिक हातांतून तलवार, बाण, त्रिशूळ, दोरी इ. आयुधे ५ चेहरे इ. रूपांतील भैरव नावाप्रमाणेच उग्र भासतो. दांडगाई करणाऱ्या माणसाला ‘'''टोळभैरव'''’ म्हणतात, याचे कारणही भैरवाची उग्रताच होय. महाराष्ट्रातील त्याच्या मूर्ती नग्न, तर ओरिसातील मूर्ती विश्वपद्मावर उभ्या असतात. तेथील काही मूर्ती तीन डोळे व मिशा असलेल्या, तर काही मूर्ती तिसरा डोळा आणि मिशा यांचा अभाव असलेल्या असतात. राजस्थानातील प्रत्येक गावात [[शमी|शमी वृक्षाखाली]] त्याची मूर्ती वा तांदळा असतो. पंजाबात त्याला मृत्यूला भिवविणारा देव मानले जाते. भैरव कुत्र्याबरोबर असतो वा त्याच्यावर स्वार होऊन राहतो, म्हणून त्याला श्वाश्व ([[कुत्रा]] हा ज्याचा घोडा म्हणजे वाहन आहे, तो) म्हणतात. तो शैवमंदिरांचा द्वारपाल व [[शक्तिपीठे|शक्तिपीठांचा]] संरक्षक आहे, भैरवाला वगळून शक्तीची पूजा केली, तर ती निष्फळ मानली जाते. शत्रूंचा नाश करण्यासाठी त्याला आवाहन केले जाते.
अनामिक सदस्य