"शाहू महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ७०:
==जातिभेदाविरुद्ध लढा==
राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांंसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.
 
== शैक्षणिक वसतिगृहे==
शाहू महाराजांनी सुरू केलेली शैक्षणिक वसतिगृहे खालीलप्रमाणे आहेत.
 
१. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस (१९०१)
२. दिगंबर जैन बोर्डिंग (१९०१)
३. वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह (१९०६)
४. मुस्लीम बोर्डिंग (१९०६)
५. मिस क्लार्क होस्टेल (१९०८)
६. दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग (१९०८)
७. श्री नामदेव बोर्डिंग (१९०८)
८. पांचाळ ब्राह्मण वसतिगृह (१९१२)
९. श्रीमती सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह (१९१५)
१०. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९१५)
११. कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृह (१९१५)
१२. आर्यसमाज गुरूकुल (१९१८)<ref>{{स्रोत पुस्तक|title=राजर्षी शाहू महाराज - जीवन व शिक्षणकार्य|last=भगत|first=प्राचार्य रा. तु.|publisher=रिया पब्लिकेशन, कोल्हापूर|year=२०१६|location=कोल्हापूर|pages=२५८ - २७७}}</ref>
 
वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रखर झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.
 
 
==इतर कार्ये==