"बळवंत पांडुरंग किर्लोस्कर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ ३३:
==जीवन==
==उल्लेखनीय==
अण्णासाहेब किर्लोस्करांनी ३१ ऑक्टोबर १८८० या दिवशी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ‘शाकुंतल’ या पहिल्या परिपूर्ण संगीत नाटकाचा पहिला प्रयोग केला.‘शांकरदिग्विजय’ हे त्याचं पहिलं गद्य नाटक. पण अण्णासाहेबांना संगीत नाटकाची स्फूर्ती मिळाली ती मात्र पारशी ऑपेराचं ‘इंद्रसभा’ हे नाटक बघून. हे गद्यपद्यात्मक नाटक बघितल्यावर मराठी रंगभूमीवरही असं नाटक झालं पाहिजे या कल्पनेनं त्यांना झपाटून टाकलं. त्यांनी लगेचंच महाकवी कालिदासांच्या ‘अभिज्ञान शाकुंतलम’ या नाटकाचं भाषांतर करायला घेतलं.पहिल्या चार अंकांचा अनुवाद झाल्यावर १८८० साली ३१ ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर या नाटकाचा पहिला प्रयोग पुण्याच्या आनंदोद्भव नाट्यगृहात संपन्न झाला. या पहिल्या प्रयोगात मोरो बापुजी वाघुलीकर (मोरोबा देव) यांनी दुष्यंत आणि बाळकृष्ण नारायण नाटेकर (बाळकोबा) यांनी कण्वमुनींची भूमिका केली. शंकरराव मुजुमदार शकुंतला तर स्वतः नाटककार अण्णासाहेब सूत्रधार,शारंगरव आणि मारिच अशा तिहेरी भूमिकेत होते.
मराठी भाषेतील पहिले संगीत नाटक '''"[[संगीत शाकुंतल]]"''' लिहून अण्णासाहेबांनी १८८० साली संगीत नाटकांची परंपरा सुरू केली. त्या नाटकात जवळपास १९८ पदे होती.
 
शाकुंतल नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे सूत्रधारनटीचा प्रवेश झाला की सूत्रधार रंगपटात जाई आणि पुन्हा परत येत नसे. अशा रीतीने अण्णासाहेबांनी सूत्रधाराकडचा संगीताचा मक्ता संपवला आणि सर्व पात्र स्वतःची गाणी स्वतःच म्हणू लागली.
 
अण्णासाहेबांच्या नाट्य आणि काव्य गुणाची स्वतंत्र प्रतिभा दर्शवणारं त्यांचं नाटक म्हणजे ‘संगीत सौभद्र’. संगीत सौभद्र या तीन अंकी नाटकाचा पहिला प्रयोग पुण्यात १८ नोव्हेंबर १८८२ या दिवशी झाला आणि नाटकाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मार्च १८८३ मध्ये झालेल्या पाच अंकी प्रयोगाच्या लोकप्रियतेमुळे अण्णासाहेबांचं नाव घरोघरी पोचलं. स्वतः अण्णासाहेबांनी सूत्रधार आणि बलराम अशा भूमिका केल्या. बाळकोबा नारद आणि कृष्ण, मोरोबा अर्जुन, भाऊराव सुभद्रा तर शंकरराव रुक्मिणी अशी पात्ररचना होती.
 
अण्णासाहेबांचे तिसरे नाटक रामराज्यवियोग ! या तीन अंकी नाटकाचा पहिला प्रयोग २० ऑक्टोबर १८८४ला झाला. रामराज्यवियोग हे नाटक पूर्ण करण्यापूर्वीच २ नोव्हेंबर १८८५ या दिवशी अण्णासाहेबांना देवाज्ञा झाली.
 
==पुरस्कार==