"बंजारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
टंकनदोष सुधरविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
आशय समृद्ध केला.
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १:
गोर बंजारा संस्कृती ही अति प्राचीन असून 'गोर' हा एक वंश आहे. या गोरवंशीय लोकांनाच भारतात बहुतांशी 'गोर बंजारा' या नावाने ओळखले जाते.गोर-बंजारा हा एक समृद्ध सांस्कृतिक परंपरा असणारा भारतीय समाज रचनेचा महत्त्वाचा घटक होय. 'गोर-बंजारा'या शब्दातील 'गोर'या शब्दाची निर्मिती 'गो-रक्षक'या शब्दापासून अधिक संभवनीय असल्याचे जाणकार सांगतात. यामधील 'गो' म्हणजे गाय व 'र' म्हणजे रक्षा.यावरुन 'गोर' म्हणजे गाईचे पालनपोषण,रक्षण करणारा लोकगण म्हणजे 'गोर.'
<br />{{गल्लत|वंजारी}}
बंजारा जमातीच्या समुदायासाठी गोरमाटी असाही एक शब्दप्रयोग केला जातो. अर्थातच गोरमाटी हा शब्दप्रयोग बंजारा बांधव आपल्या स्वकीयांसाठीच करताना दिसतात. तसेच बंजारा हा शब्द आपल्या भारतीयांना अपरिचित आहे असे मुळीच नाही. अनेक सिनेगीतातून, हिंदी काव्यरचना इत्यादींमधून 'बंजारा' या शब्दाचा उल्लेख विविध ठिकाणी आपणास सापडतो. 'बंजारा' लोकगणासाठी व्यापक अर्थाने गोरबंजारा असा शब्द प्रयोग होताना दिसतो .
''. ''' गोर बंजारा संस्कृती ही अति प्राचीन असून 'गोर' हा एक वंश आहे. या गोरवंशीय लोकांनाच भारतात बहुतांशी 'गोर बंजारा' या नावाने ओळखले जाते. '''''' ('''गोर''', '''लंबाणी''' आणि '''गोरमाटी''' असेही म्हणतात) हा [[भारतीय उपखंड]]ातील ([[अफगाणिस्तान]] पासून [[राजस्थान]] राज्यापर्यंत) उत्तरपश्चिम बेल्टमधील भटक्या जमातीचे लोक म्हणून ओळखले जाणारा एक समुदाय आहे परंतु आता हा समाज भारताच्या जवळपास सर्वच राज्यामध्येही आढळतो.
आपल्या भारतात वेगवेगळ्या राज्यांत, भौगोलिक प्रदेशात बंजारा समाज हा 'बंजारा' 'गोर-बंजारा' 'गोरमाटी' 'लमाणी', 'लमाण' 'लभाण' 'लभाणी','लभाणा', 'लंबाडा' 'सुगाळी' 'सुकळीर', 'यादगीर' इत्यादी अनेकविध नावाने ओळखला जातो. आजमितीला गोर-बंजारा समाज हा भारतातील जवळ जवळ सर्वच राज्यांमध्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये कमी-अधिक प्रमाणात वास्तव्यास असल्याचे पहावयास मिळते.
बंजारा लोकांच्या वस्तीस्थानाला [[तांडा]] असे म्हणतात. महाराष्ट्रातील विदर्भ भागामध्ये विशेषत: यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बंजारा समाजाचे लोक राहतात.
• बंजारा शब्दाचा अर्थ व उत्पत्ती :-
[[वर्ग:महाराष्ट्रातील विमुक्त जाती]]
१. वाणिज्यकार :- ऋग्वेदात व्यापाराशी संबंध असणाऱ्या व्यक्तीस 'वाणिज्य' असे म्हटले आहे. इतिहासात डोकावून पाहिल्यास 'बंजारा' या शब्दाची उत्पत्ती 'वाणिज्य' या संस्कृत शब्दापासून झाली असल्याचे जाणकारांचे मत आहे.
गोर-बंजारा लोक पूर्वीच्या काळी कापडाचे तागे, अन्नधान्य, मीठ, मिरची व मसाल्यांचे पदार्थ, सैनिकांना रसद पुरविण्यासाठी अन्नधान्य इत्यादी पदार्थ पद्धतशीरपणे आ आपल्या बैलांच्या पाठीवर लादून भारतातील वेगवेगळ्या प्रांतात,वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवत असत व परत येताना नारळ, खजूर, केशर, यासारखा सुकामेवा व इतर जीवनावश्यक वस्तू आपल्या बैलांच्या पाठीवर लादून आणत असत. यालाच 'लदेणी' असे म्हणतात.
'वाणिज्य' या संस्कृत शब्दाचा हिंदी भाषेत 'बनज'असा शब्द प्रयोग आढळतो. 'बनज'म्हणजे व्यापार करणाऱ्यांस 'बनिज' असे संबोधले जाई. पुढे 'बनिज' या शब्दावरून 'बंजारा' हा शब्द रूढ झाला असावा असा युक्तिवाद केला जातो.
२.बनचर :- 'बंजारा' हा लोकवाचक शब्द 'बनचर' या हिंदी शब्दावरून रूढ झाला असावा असाही तर्क वर्तविला जातो. 'रानोमाळ भटकंती करणारा' या अर्थाने बंजारा शब्दाचा उर्दू भाषेतील अर्थ सुद्धा विचारात घेण्यासारखा आहे असे गोर- बंजारा संस्कृतीचे अभ्यासक आत्माराम राठोड, डॉ.सुभाष राठोड म्हणतात. 'बंनचर' म्हणजे वनात वास्तव्य करणारा लोकसमूह.
बंजारा लोकगणाच्या यासंदर्भात एक बाब अशी दिसते की, गोर-बंजारांची लोकवस्ती आजही प्रामुख्याने डोंगराळ भागात डोंगर पायथ्याजवळ असल्याचे आढळून येते. डोंगराळ भाग निवडण्यामागे एक मुख्य कारण असे दिसते की गोर-बंजारांकडे मोठ्या प्रमाणात गुरे - ढोरे होती. त्यांना चारण्यासाठी ते वनाचा आसरा घेत असत. कालांतराने त्यांचा परंपरागत लदेणीचा व्यवसाय बंद पडल्याने ते जेथे होते तेथेच त्यांना स्थिरावणे भाग पडले असावे व 'बनचर' या शब्दाचे अपभ्रंश रूप 'बंजारा' असे झाले असावे. म्हणून'बनचर'या शब्दापासून 'बंजारा' या शब्दाची उत्पत्ती झाली असावी हेही नाकारता येत नाही.
भारतीय गोर-बंजारा समाजगण हा एक आदिम समाजगण असून त्यांची लोकसंस्कृती ही तितकीच पुरातन व लौकिक असल्याचे दिसते. गोर बंजाराचा इतिहास हा त्याग, बलिदान, शौर्य व पराक्रम यांनी समृद्ध आहे. उपजतच कष्टाळू, मुलत:च सृजनशील असा हा समाजगण असून आपले सांस्कृतिक आविष्कार सण-उत्सव आदींच्या माध्यमातून व्यक्त करणारा, नाच-गाण्यात आनंद शोधणाऱ्या बंजारा समाजाने काशीदाकारी सारख्या अनेक कलाकुसरींची मनोभावे जपणूक केली आहे.
संपूर्ण भारतात गोरबंजारा हा समाजगण सर्वत्र विखुरलेला असून भारताच्या अगदी कानाकोपऱ्यांपर्यंत त्यांच्या वस्त्या आहेत. नदिनी व्यवसायाच्या निमित्ताने मध्ये युगापर्यंत हा समाज भारताच्या वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात अविरत भटकंतीचे जीवन जगत होता.आपला परंपरागत व्यवसाय इंग्रजांच्या आगमनानंतर उध्वस्त झाल्याने सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र तो एका ठिकाणी फिरल्याचे उपलब्ध पुराव्यांवरुन दिसते. गोरबंजारा वस्तीस्थानास 'तांडा' असे म्हणतात. पांडा या शब्दाचा मूळ अर्थ पहिल्यास सामानांच्या गोण्या लागलेल्या गाई-बैलांचा 'काफिला' म्हणजे कळप असा आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/बंजारा" पासून हुडकले