"मराठी रंगभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ६:
 
==सामाजिक नाटके==
 
मराठीतील स्वतंत्र नाटकांना सुरुवात झाली ती सामाजिक नाटकापासून. गोविंद ना. माडगावकर यांनी आपले ‘व्यवहारोपयोगी नाटक’ १८५९ साली प्रसिद्ध केले. पण 'तृतीय रत्‍न' या इ.स. १८५५ साली लिहिलेल्या नाटकामुळे पहिले लिखित मराठी नाटक असून, जोतिराव फुले हे पहिले मराठी नाटककार आहेत.आपली परिवर्तनवादी चळवळ सशक्त आणि परिणामकारक करण्यासाठी ‘नाटक’ या हत्याराचा वापर करण्याचा त्यांचा हेतू होता.
नाटकाचे स्वरूप:-
या नाटकाला रूढ कथानक नाही. त्यात एक शोषकाचा, एक शोषिताचा असे दोन पक्ष आहेत. अशिक्षित कुणबी, त्याची बायको, भिक्षुक जोशी, त्याचा भाऊ, त्याची पत्‍नी, एक ख्रिस्ती धर्मोपदेशक, एक मुसलमान आणि विदूषक अशी एकूण आठ पात्रे आहेत. या सर्वच पात्रांना स्वत:चे असे चेहरे नाहीत. नाटकाची संकल्पना प्रातिनिधिक पातळीवर आहे. समाजातील एक विशिष्ट वर्ग जन्माने उच्च असल्याच्या एकमेव भांडवलावर समाजातील दुसर्‍या एका अंधश्रद्ध, अडाणी, गरीब वर्गाला कसा लुबाडत असतो, नागवित असतो याचेच प्रातिनिधिक चित्रण या नाटकात आहे.
'संदर्भ:-''म. फुले समग्र वाङमय,1991,पाचवी आवृत्ती)'''
 
==कल्पनाप्रधान नाटके==