"मराठी रंगभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोठा मजकुर वगळला ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
==भाषांतरित नाटके==
:-
'''मराठी रंगभूमीवरील बुकिश नाटके:-'''
मराठी रंगभूमीवर बुकिश नाटकांची लाट आली तो कालखंड म्हणजे विष्णुदास भावेंच्या कालखंडानंतर साधारणपणे १८६१ च्या दरम्यान विश्वविद्यालयाची स्थापना होऊन महाराष्ट्रात इंग्रजी शिक्षण सुरु झाल्यावर त्या शिक्षणाने जे काही परिणाम झाले त्यातील एक म्हणजे लोकांची बुकिश नाटकाकडील प्रवृत्ती वाढली. कॉलेजमध्ये शेक्सपिअर, कालिदास यांच्या नाटकाचा रसास्वाद जेव्हा उमजू लागला तस तसे इंग्रजी, संस्कृत नाटकाचे प्रयोग होऊ लागले. संस्कृत नाटकांची, इंग्रजी भाषेतील नाटकांची भाषांतरे होऊन पाश्चिमात्य रीतीरिवाज, आचारविचार यांच्याकडे मराठी रंगभूमीचा ओढा वाढला. विद्वान मंडळींनी संस्कृत व इंग्रजी नाटकांची भाषांतरे किंवा रुपांतरे केली त्याचबरोबर स्वतंत्र नाटके मराठीत रचून नाटक मंडळींना शिकवली याचा मराठी रंगभूमीला उपयोग झाला व सुधारणा झाली. बुकिश नाटकांकडे कल वाढविण्यास प्रामुख्याने ‘आर्योद्धारक नाटक मंडळी’ कारणीभूत आहे. ‘वेणीसंहार’, ‘ऑथेल्लो’, ‘तारा’, ‘किंगलियर’, शंकरराव पाटकर हे नट ‘ऑथेल्लो’ नाटकातील ‘यागोची’ व्यक्तिरेखा खूप कमालीची करीत. बुकिश नाटकापासून पडदे, पोशाख, देखावे वैगरे या बाबतीत खूपच सुधारणा झाल्या. बुकीश नाटक संबंधाने सर्वात चांगले नाव मिळवलेली नाटक मंडळी म्हणजे ‘शाहूनगरवासी’ हीच होय. ‘त्राटिका’ हे नाटक शेक्सपिअरच्या ‘टेमिंग ऑफ धी सरू’ या नाटकाच्या आधारावर रचलेले आहे. विनोदी व हास्यपूर्ण आहे. प्रोफेसर वासुदेवराव केळकर व शंकर मोरो रानडे यांच्या साह्याने ही मंडळी बुकीश नाटकाचे प्रयोग करीत असे. सामाजिक, ऐतिहासिक नाटकेसुद्धा या दरम्यान रंगभूमीवर आली. मराठीतील स्वतंत्र नाटकांना सुरुवात झाली ती सामाजिक नाटकापासून. गोविंद ना. माडगावकर यांनी आपले ‘व्यवहारोपयोगी नाटक’ १८५९ साली प्रसिद्ध केले. स्वतंत्र पहिले ऐतिहासिक नाटक म्हणून ‘थोरले माधवराव पेशवे’ याचा उल्लेख करावा लागेल. वि. ज. किर्तने यांनी १८६१ साली हे लिहिले. बुकीश नाटकांनी मराठी रंगभूमीवर गद्य नाटके समृद्ध केली.
(संदर्भ: भरत नाटय संशोधन मंदिर)
 
==सामाजिक नाटके==