"मानसशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ११:
== इतिहास ==
१९व्या शतकाच्या उत्तरार्धात मानसशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याआधी प्लेटो, ॲरिस्टाॅटल या ग्रीक तत्त्वज्ञांनी मानवाच्या मनाचा व आत्त्म्याचा आभ्यास केला आहे. ॲरिस्टाॅटलने (इ.स.पूर्व.३८४-३२२) मन हे शरीराचे कार्य आहे असे प्रतिपादन केले आहे. पुरातन काळात Psychology म्हणजे 'आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र' ही व्याख्या उदयास आली होती. Psyche (साइक) म्हणजे आत्मा व logus (लोगस) म्हणजे विज्ञान असा अर्थ याची फोङ केल्यावर होतो. ही कल्पना अनेक शतके होती.'De Anima' या ग्रंथात मानसशास्त्र विषयक अभ्यास केला आहे. त्यानेही आत्मास Psyche ही संज्ञा वापरली होती. हिप्पोक्रेटिसचा मेंदूचा अभ्यास, हेरोफिलसचा शवविच्छेदन करून केलेला अभ्यास हे एक प्रकारे मानसशात्रीय अभ्यास, शारीरिक हालचाली इत्यादी माहिती देणारे होते. गॅलनने तर शरीरशास्त्राच्या अभ्यासाबरोबर मानसशास्त्रीय अभ्यासही करण्याचे प्रयत्न केले. उदा० व्यक्तिमत्त्वातील घातक भावनानुभव, इत्यादी. १६व्या शतकात मानसशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले गेले. इ.स १४५० ते १५५० हा कालखंड युरोपचा प्रबोधन काळ मानला जातो.१७व्या शतकात देकार्तने केलेले कार्य विचारात घेण्यासारखे आहे.'आय थिंक;देअरफोर आय एम' हे त्याचे विधान जगविख्यात आहे. याने प्रतिक्षिप्त क्रिया, भावना, इत्यादींबाबत अभ्यास केला. यानंतर लॉक, बेन, हर्बर्ट इत्यादी ब्रिटिश-जर्मन तज्ज्ञांनी मन व शरीर यांचे स्वतंत्र अस्तित्व, परस्परावलंबित्व स्पष्ट करण्याचा प्रारंभ केला. मानवी मनाचा व वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय, अशी नवीन व्याख्या तयार केली आहे. सिग्मंड फ्राईड हा मनोविश्लेषणवादाचा जनक आहे.
 
मानसशास्त्रात वर्तनाला अत्यंत महत्वाचे स्थान दिसून येते.एकूण मानसशास्त्रीय संशोधन हे वर्तनाभोवती दिसून येते.वर्तन म्हणजे उद्दिपकाला अनुसरून व्यक्ती अथवा प्राण्याने केलेली कोणतीही ‍‍प्रतिक्रिया होय.‍‍‍‍‍‍‍‍‌‌‌‍-
 
वर्तनामध्ये पुढील तीन पैलू दिसून येतात
 
१ . बोधात्मक -या वर्तनामध्ये व्यक्तीच्या वेदन, संवेदन, स्मरण,विचार,अध्ययन, भाव,भावना, इ.चा समावेश होतो.
 
२ . भावात्मक - या वर्तनामध्ये सुख,दु:ख,राग,आनंद ,भीती,इ.बाह्य भावभावनांचा समावेश होतो.
 
३ . क्रियात्मक - या वर्तनामध्ये चालणे, बोलणे,लिहिणे, पोहणे, हसणे,इ.अनेक शारीरिक हालचालीच्या दृश्य स्वरूप वर्तनाचा समावेश होतो.
 
मॉर्गन किंग - मानव व मानवेतर प्राण्याच्या अनुभवनिष्ठ वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय.
 
==मानसशास्त्रावरील मराठी पुस्तके==