"चित्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३२:
 
== आहार व शिकार पद्धत ==
चित्ता हा मांसभक्षक असून त्याच्या आहारात छोट्या हरिणांचा समावेश होतो. अाफ़्रिकेत मुख्यत्वे [[इंपाला]], विविध प्रकारचे गॅज़ेल, [[स्प्रिंगबक]] हे त्याचे खाद्य आहे. तो कधीकधी झेब्रा किंवा [[वाईल्ड बीस्ट]] अशा मोठ्या प्राण्यांचीही शिकार करण्यात यश मिळवतो. चित्त्याचे अतिशय वेगवान होण्याचे कारण त्याचे खाद्य आहे. हरणे ही देखील अतिशय वेगाने पळू शकतात व त्यांना गाठण्यासाठी चित्त्याला अतिवेग मिळवावा लागला आहेलागतो.
 
चित्ता साधारणपणे दिवसा शिकार साधतो. सकाळी लवकर अथवा संध्याकाळी उन्हे कलल्यानंतर तो शिकार साधतो. दुपारच्या उन्हात तापमानामुळे तो शिकार करणे टाळतो. दुरून शिकार टेहळल्यावर भक्ष्याच्या जास्तीत जास्त जवळ दबा धरून जातो व भक्ष्य साधारणपणे १० ते २० मीटरवर आल्यावर तो जोरदार वेगवान चाल करतो. चित्त्याची ही चाल पाहणे अतिशय नेत्रसुखद अनुभव असतो. अनेक छायाचित्रकार चित्त्याचा हा क्षण टिपण्यास आतुर असतात. चित्ता कधी लांबवर खूप काळ पाठलाग करत नाही. चित्याला वेग असला तरी लांबवर पाठलाग करण्याचे बळ त्याच्यापाशी नसते. साधारणपणे १ ते दीड मिनिटापर्यंत पाठलाग करून शिकार साधतो. नाही जमल्यास शिकारीचा नाद तात्पुरता सोडून देतो. पाठलाग करताना चित्ता आपल्या भक्ष्याला सरळसरळ गळा पकडून ठार मारत नाही. पाठलागादरम्यान सुरुवातीला भक्ष्याला पाडायचा डाव असतो व त्यानंतर त्याचा वेग कमी होतो व मग जखमी करून मग तो त्याला मारतो. शिकार साधल्यानंतर चित्ता बराच वेळ दम खातो. त्याचे शरीराचे तापमान पाठलागादरम्यान प्रचंड वाढते व ते कमी करण्यात बराच वेळ जातो.
"https://mr.wikipedia.org/wiki/चित्ता" पासून हुडकले