"दमाल कृष्णस्वामी पट्टम्माल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
"D. K. Pattammal" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
(काही फरक नाही)

१४:४४, ९ मार्च २०२० ची आवृत्ती

दमाल कृष्णस्वामी पट्टम्माल (१९ मार्च १९१९[१] - १६ जुलै २००९)[२] एक भारतीय कर्नाटक संगीतकार आणि तामिळ चित्रपटातील गायिका होत्या. त्यांच्या समकालीन एमएस सुब्बुलक्ष्मी आणि एम.एल. वसंतकुमारी यांना एकत्रीतपणे अजूनही "कर्नाटिक संगीताची त्रिमुर्ती " म्हणून ओळखले जाते. या त्रिकुटाने कर्नाटक संगीतच्या मुख्य प्रवाहात महिलांच्या प्रवेशास सुरुवात केली. जगभरातल्या कर्नाटक संगीत प्रेमींनी त्यांचे कौतुक केले आहे.[३]

जीवन आणि पार्श्वभूमी

पट्टम्माल यांचा जन्म भारताच्या तामिळनाडूच्या कांचीपुरम येथील ब्राह्मण कुटुंबात झाला होता.[४] त्यांचे नाव अलामेलु असे ठेवले गेले, परंतु प्रेमाने त्यांना “पट्टा” म्हटले जात असे.[५] त्यांचे वडील दमाल कृष्णस्वामी दीक्षितर यांना संगीताची आवड होती व कर्नाटक संगीत शिकण्याची प्रेरणा त्यांच्या कडून मिळाली.[६] त्यांची आई कांतीमती (राजम्माल) स्वतः एक गायक असूनही कठोर रूढीवादी परंपरांमुळे मित्रपरिवारा साठी सुद्धा त्यांना गायला परवानगी नव्हती. अशी पार्श्वभूमी असूनही, पट्टम्माल यांनी लहान वयातच गायन सुरू केले आणि संगीतात बर्‍यापैकी प्रतिभा दर्शविली.

त्यांना गुरूकुलाचे औपचारिक प्रशिक्षण नव्हते.[७] लहानपणी, पट्टम्माल एखाद्या मैफिलींमध्ये बसत आणि घरी परततांना ऐकलेल्या गाण्याचे व रागांचे मुख्य भाग लक्षात घेत. त्यांचे भाऊ डीके रंगनाथन, डीके नागराजन आणि डीके जयरामन तिला या कार्यात मदत करत असे. त्यांनी वडिलांनी शिकवलेले साधे भक्तिगीत पण गायली आहेत. नंतर, त्यांला तेलगू भाषिक संगीतकारांकडून शिक्षण मिळाले, ज्यांना त्या "तेलगू वडियार" किंवा "तेलगू शिक्षक" असे म्हणत. त्यांती पट्टम्मालला तेलगू आणि संस्कृत शिकवले.[८]

गायन

वयाच्या आठव्या वर्षी पट्टम्माल यांनी भैरवीतले त्यागराजांचे "रक्षा बेट्टरे" गाण्यासाठी एका स्पर्धेत प्रथम पुरस्कार जिंकला.[५]

 
भाऊ डीके जयरामन यांच्या सोबत मैफिलीत पट्टम्माल (उजवीकडे); १९४०च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात.

१९२९ मध्ये, वयाच्या दहाव्या वर्षी, पट्टमाल यांनी मद्रास कॉर्पोरेशन रेडिओसाठी (ज्याला आता आकाशवाणी म्हणून ओळखले जाते) प्रथम रेडिओवर गीत सादर केले. ३ वर्षांनंतर १९३२ मध्ये मद्रास रसिक रंजनी सभेमध्ये पहिल्यांदा सार्वजनिक मैफिलीत गीत प्रस्तुत केले.[५] एका वर्षा नंतर, त्या मैफिलीत नियमित कलाकार म्हणून चेन्नईला स्थायीक झाल्या. १९३९ मध्ये पट्टम्मालने आर. ईश्वरनशी लग्न केले.

संगीताची ही शैली सार्वजनिकपणे सादर करणारी ती पहिली ब्राह्मण महिला होती.[४]

मृत्यू

१६ जुलै २००९ रोजी दुपारी दीड वाजता पट्टम्मलचे चेन्नई येथे नैसर्गिक कारणांमुळे निधन झाले.[२] त्यांचे पती आर. इस्वरन यांचे वयाच्या ९५व्या वर्षी, २ एप्रिल २०१० रोजी, निधन झाले.

पुरस्कार

संदर्भ

  1. ^ Janani Sampath. https://web.archive.org/web/20180327002006/https://www.dtnext.in/News/TamilNadu/2018/03/15013332/1065104/Yearlong-celebrations-to-mark-DK-Pattammals-birth-.vpf. Archived from the original on 27 March 2018. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ a b The Hindu. 17 July 2009. Missing or empty |title= (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)
  3. ^ The Hindu. 4 August 2003. Archived from the original|archive-url= requires |url= (सहाय्य) on 30 August 2009. Missing or empty |title= (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)
  4. ^ a b Music with feeling
  5. ^ a b c D Ram Raj (18 July 2009). Daily News and Analysis. Missing or empty |title= (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)
  6. ^ Deccan Chronicle. 16 July 2009. Missing or empty |title= (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)
  7. ^ Gowri Ramnarayan (17 July 2009). The Hindu. Missing or empty |title= (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)
  8. ^ https://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-fridayreview/The-voice-that-touched-the-skies/article15939106.ece. Missing or empty |title= (सहाय्य)