"अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचा
ओळ ३५:
जून १९७७ मध्ये राज्य विधानसभेच्या निवडणुका झाल्या.त्यात अभाअण्णाद्रमुक पक्षाने २३४ पैकी १३० जागा जिंकल्या तर द्रमुक पक्षाने ४८ जागा जिंकल्या. एम.जी.रामचंद्रन स्वतः अरुपकोट्टाई विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. ३० जून १९७७ रोजी त्यांचा तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. दरम्यान काँग्रेस आणि द्रमुक पक्षातले संबंध सुधारले आणि अभाअण्णाद्रमुक इंदिरा काँग्रेसपासून दूर गेला. काँग्रेस आणि द्रमुक पक्षांनी १९८० च्या लोकसभा निवडणुका युती करून लढवल्या. या निवडणुकांमध्ये अण्णाद्रमुकचा मोठा पराभव झाला. काँग्रेस आणि द्रमुक युतीने ३९ पैकी ३६ जागा जिंकल्या तर अभाअण्णाद्रमुक पक्षाला केवळ २ जागा जिंकता आल्या.
 
[[चित्र:Kalaignar M. Karunanidhi.jpg|left|thumb|एम.करुणानिधी]]
सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर [[इंदिरा गांधी|इंदिरा गांधींनी]] विरोधी पक्ष सत्तेत असलेली अनेक राज्य सरकारे बरखास्त केली. त्यात रामचंद्रन यांचे सरकारही बरखास्त झाले. मे १९८० मध्ये राज्य विधानसभेसाठी निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये २३४ पैकी १२९ विधानसभा जागा जिंकून सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाची भरपाई पक्षाने केली. काँग्रेस-द्रमुक युतीने ६८ जागा जिंकल्या. [[९ जून]],[[१९८०]] रोजी .एम.जी.रामचंद्रन यांनी दुसर्‍यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली.