३६४
संपादने
No edit summary |
No edit summary |
||
ॲसेम्ब्ली भाषा तुलनेने कार्यक्रमणास सुकर असली तरी तिचे आदेश निम्नस्तरीय असल्याने कार्यक्रम विकसित करणाऱ्या व्यक्तीस सूक्ष्म स्वरूपातील रूपरेखा तयार करावी लागते. शिवाय ॲसेम्ब्ली भाषा संगणक सापेक्ष असल्याने संगणक बदलल्यास संपूर्ण कार्यक्रमाचे पुनर्लेखन करावे लागते. यास्तव उच्च्स्तरीय भाषांचा विकास करण्यात आला.
कार्यक्रमणाची सुरूवात समस्येसाठी रीती तयार करण्यापासून होते. रीतीमध्ये समस्या सोडविण्याची तार्किक पद्धत वर्णिलेली असते. क व ख या दोन एक-अंकी संख्यांच्या गुणाकाराचे उदाहरण घेऊन याचे स्पष्टीकरण करता येईल. अशा गुणाकाराची रीती पुढीलप्रमाणे सांगता येईल : (१) क ही संख्या स्वत:मध्ये ख वेळा मिळवून येणारे उत्तर ग समजा. (२) क आणि ख यांचे ऋण-धन चिन्ह समान असल्यास गचे चिन्ह धन व असमान असल्यास ते ऋण असे मांडा. (३) ग हे गुणाकाराचे उत्तर होय.
|
संपादने