"संगणक कार्यक्रमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८४५ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
 
यास्तव प्रत्येक संगणक स्वत:ची अशी एक ॲसेम्ब्ली [[भाषा]] (वर्णाक्षरी भाषा) उपलब्ध करून देतो. या भाषेतील आदेश अंकांऐवजी अक्षरे वापरतात व त्यामुळे ते लक्षात ठेवण्यास तुलनेने सोपे असतात. यामध्ये संगणकाच्या स्मृतीतील क्रमपत्त्यांनाही नावे देता येतात. ॲसेम्ब्ली भाषेतील प्रत्येक आदेशाचे यंत्रभाषेतील आदेशात एकास एक या प्रमाणात भाषांतर होते. मूळ कार्यक्रमाचे असे भाषांतर करणारे ॲसेम्ब्लर सॉफ्टवेअर सर्वांना उपयोगी पडतील अशी काही लायबरी रूटिनेही (सुटे भाग) उपलब्ध करून देते.
 
ॲसेम्ब्ली भाषा तुलनेने कार्यक्रमणास सुकर असली तरी तिचे आदेश निम्नस्तरीय असल्याने कार्यक्रम विकसित करणाऱ्या व्यक्तीस सूक्ष्म स्वरूपातील रूपरेखा तयार करावी लागते. शिवाय ॲसेम्ब्ली भाषा संगणक सापेक्ष असल्याने संगणक बदलल्यास संपूर्ण कार्यक्रमाचे पुनर्लेखन करावे लागते. यास्तव उच्च्स्तरीय भाषांचा विकास करण्यात आला.
३५२

संपादने