"संगणक कार्यक्रमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आर्टिकल तयार केले
(काही फरक नाही)

१६:२४, ७ मार्च २०२० ची आवृत्ती

(कॉम्प्युटर प्रोगामिंग). संगणकाचा वापर करून एखादे प्रमेय किंवा समस्या सोडविण्यासाठी, अथवा एखादे फलित साध्य करण्यासाठी, सुयोग्य रीती विकसित करून तिची संगणकावर कार्यान्वित करता येईल अशा क्रमबद्ध आदेशांच्या रूपात मांडणी करण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेला ‘ संगणक कार्यक्रमण ’ म्हणतात. प्रत्येक  अंकीय संगणकाला स्वत:ची अशी एक यंत्रभाषा असून त्या भाषेतील कार्यक्रमानुसार तो सांकेतिक स्वरूपातील माहितीवर संस्करण करतो. यंत्रभाषेतील आदेश हे द्विमान अंकांच्या स्वरूपात असल्याने त्यात थेट कार्यक्रमण करणे क्लिष्ट असते.