"अजीवोपजीवीजन्य वनस्पतिरोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
वनस्पतींना होणारे कित्येक [[रोग]] जीवोपजीवी म्हणजे दुसऱ्‍या जीवांवर उपजीविका करणाऱ्‍या जीवांमुळे होत असतात. अशा म्हणजे जीवोपजीवी जीवांच्या क्रियेखेरीज इतर कारणांनी होणाऱ्‍या रोगांचा समावेश अजीवोपजीवीजन्य रोगांत केला जातो. या रोगांमुळे वनस्पतींच्या कोशिकाक्रियांत बिघाड होतो. व्हायरसजन्य रोगांपेक्षा हे रोग भिन्न असतात. कारण हे बहुधा परिस्थितिजन्य असून संक्रामक (फैलावणारे) नसतात.
 
या रोगांची अनेक कारणे आहेत, ती अशी : (१) वनस्पतींच्या वाढीला पोषक तापमान नसणे—तापमान अति-उष्ण अथवा अतिशीत असल्यास प्रत्येकाची भिन्न लक्षणे निरनिराळ्या पिकांवर आढळतात. (२) योग्य प्रकाशाचा अभाव. (३) पोषक हवामानाची अथवा ऑक्सिजनाची न्यूनता (कमतरता). (४) दूषित [[हवामान]].(५) मातीतील आर्द्रता कमी किंवा अधिक असणे. (६) मातीतील कार्बनी पदार्थांच्या विघटनामुळे उद्भवणारे विषारी पदार्थ. (७) पोषक व घटक द्रव्यांची उणीव वा आधिक्य. (८) पीक संरक्षणात तीव्र कवकनाशके व कीटकनाशके यांचा उपयोग. (९) इतर कारणे.