"अजीवोपजीवीजन्य वनस्पतिरोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
 
या रोगांची अनेक कारणे आहेत, ती अशी : (१) वनस्पतींच्या वाढीला पोषक तापमान नसणे—तापमान अति-उष्ण अथवा अतिशीत असल्यास प्रत्येकाची भिन्न लक्षणे निरनिराळ्या पिकांवर आढळतात. (२) योग्य प्रकाशाचा अभाव. (३) पोषक हवामानाची अथवा ऑक्सिजनाची न्यूनता (कमतरता). (४) दूषित हवामान.(५) मातीतील आर्द्रता कमी किंवा अधिक असणे. (६) मातीतील कार्बनी पदार्थांच्या विघटनामुळे उद्भवणारे विषारी पदार्थ. (७) पोषक व घटक द्रव्यांची उणीव वा आधिक्य. (८) पीक संरक्षणात तीव्र कवकनाशके व कीटकनाशके यांचा उपयोग. (९) इतर कारणे.
 
यांपैकी एक अथवा अधिक कारणे वनस्पतीच्या वाढीच्या काळात आढळल्यास त्यांचा वनस्पतीवर परिणाम होऊन निरनिराळी लक्षणे उद्भवतात. म्हणूनच या प्रत्येक कारणाचा स्वतंत्ररीत्या विचार कारावा लागतो.