"कोपर्निकस, निकोलेअस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
(१९ फेब्रुवारी १४७३–२४ मे १५४३). (मिकोली कॉपेरनीक किंवा निक्लास कोपरनिक या नावाचे लॅटिनीकरण होऊन हे नाव आले आहे.) पोलिश (प्रशियन) ज्योतिषशास्त्रज्ञ, गणिती, धर्मोपदेशक आणि [[वैद्य]]. [[पृथ्वी]] गोल असून स्वतःभोवती फिरत असते व सर्व [[ग्रह]] पृथ्वीभोवती न फिरता स्थिर अशा सूर्याभोवती फिरत असतात, ही कल्पना त्यांनी रूढ केली. त्यामुळे गॅलिलिओ यांची दुर्बिण, केल्पर यांचे गतीविषयीचे [[नियम]] व न्यूटन यांचे गुरुत्वाकर्षणाचे नियम यांना चालना मिळाली. म्हणून ते आधुनिक ज्योतिषशास्त्राचे एक संस्थापक मानले जातात.
 
त्यांचा [[जन्म]] व्हिश्चला नदीच्या तीरी असलेल्या टॉर्न (मध्य [[पोलंड]]) येथे झाला. त्याचे शिक्षण लॅटिन व ग्रीक भाषांत झाले. फ्रेको विद्यापीठात त्यांनी वैद्यक व धर्मशास्त्र यांचे अध्ययन केले (१४९१–९४) १४९६ साली ते कॅनन लॉच्या (धर्मविषयक कायद्याच्या) अभ्यासासाठी बोलोन्या ([[इटली]]) येथे गेले. तेथेच त्यांना ज्योतिषशास्त्राची गोडी लागली व त्याचे त्यांनी अध्ययनही केले (१४९६–१५००).
 
१५०० साली पोप यांच्या निमंत्रणावरून ते रोमला गेले व तेथे त्यांनी ज्योतिषशास्त्र व [[गणित]] यांवर व्याख्याने दिली. त्यांची १४९७ सालीच फ्राउएनबुर्ख (फ्रॉमबर्क) येथील कॅथीड्रलचे कॅनन म्हणून नेमणूक झालेली होती. म्हणून १५०१ साली शिक्षण अर्धवट सोडून ते पोलंडला परतले, परंतु ते लगेच इटलीतील पॅड्युआ येथे गेले व तेथे त्यांनी वैद्यक व तत्त्वज्ञान यांचे अध्ययन केले (१५०१–०३). १५०३ साली त्यांनी फेरारा येथे कॅनन लॉ या विषयातील डॉक्टरेटची पदवी संपादन केली.