"कोपर्निकस, निकोलेअस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १०:
 
बुध व शुक्र सूर्याभोवती फिरत असल्याचे जुन्या लॅटिन ग्रंथांमधील उल्लेख त्यांच्या वाचनात आले. या कल्पनेला व्यापक रूप देऊन त्यांनी पृथ्वीसह सर्वच ग्रह स्थिर अशा सूर्याभोवती फिरत असतात, ही कल्पना मांडली. मात्र त्यांची कल्पना व हल्लीची सूर्यकुलासंबंधीची कल्पना यांमध्ये खूप फरक आहे. त्यांनी ग्रहांच्या कक्षा वर्तुळाकार मानून विश्वासंबंधीची (सूर्यकुल) कल्पना मांडली होती. तीनुसार सूर्य हा मध्य असलेल्या निरनिराळ्या एककेंद्रीय वर्तुळांत स्वस्थ गोल फिरत असतात.
 
चंद्रासह पृथ्वी अशा एका वर्तुळात फिरत असते व तिला स्वतःभोवती फिरण्यास चोवीस तास व सूर्याभोवती फिरण्यास एक वर्ष लागते. यामुळे ऋतू व ⇨ संपातचलन यांची संगती लावता आली. सर्वांत बाहेरच्या वर्तुळात नक्षत्रे असून ती एका दिवसात सूर्याभोवती फेरी मारतात, असे ही त्यांचे मत होते. वेधांवरून येणाऱ्या ग्रहांची विकेंद्रता (वर्तुळाकार कक्षेपासून होणारे विचलन) आणि गतीमधील असमानता या बाबींचे स्पष्टीकरण करण्यासाठी मात्र त्यांनी पूर्वीच्या परंपरेनुसार अधिवृत्तांचाच [एका वर्तुळाचा मध्य दुसऱ्या वर्तुळावरून फिरत असता पहिल्या वर्तुळावर फिरणाऱ्या बिंदूच्या मार्गाचाच, → अधिवृत्त] अवलंब केला कारण त्यांची निरीक्षणाची साधने अगदी प्राथमिक स्वरूपाची होती.