"एस्थर डुफ्लो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २१:
डुफ्लो यांनी आपले सहकारी अभिजित व क्रेमर यांच्या सहकाकार्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी यादृच्छित (सर्वसाधारण) नियंत्रित चाचणी (रँडमाईज्ड कंटोल ट्रायल – आरसीटी) ही पद्धत विकसित केली. सदरची पद्धत मोठ्या प्रमाणावर औषध निर्मिती क्षेत्रात नवीन औषधांची चाचणी करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे औषधांच्या स्विकृतीसंबंधी जसे निर्णय घेणे शक्य होते, तसे एखाद्या धोरणाची पडताळणी करून गरिबी हटविण्यासाठी ते कितपत यशस्वी ठरू शकेल हे ठरविता येते. भारतातील विकासाच्या अनेक धोरणांना त्या वेडसरपणा (खूळ) असे संबोधतात.
 
दिशाहीन धोरणामुळे अर्थव्यवस्थेला फार लाभ झाला नाही, हे आपल्या मुल्यमापनाच्या आधारे ते स्पष्ट करतात. ग्रामीण भागातील प्रयोगासाठी जास्तीत जास्त लोकांचा समावेश करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांनी ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा २००५’ ([[महात्मा गांधी]] नॅशनल सरल एप्लायमेंट गॅरन्टी ॲक्ट २००५) ची उपयुक्तता तपासण्यासाठी ३,००० ग्रामपंचायती व सुमारे ३ कोटी लोकांची पाहणी केली.
 
सध्या हरियाणातील शेकडो मुलांच्या लस्सीकरणाचा कार्यक्रम त्या राबवीत असून त्यासाठी भ्रमणध्वनी (मोबाईल) लस्सीकरणाचा त्यासाठी पुरस्कार करतात. त्यांच्या अभूतपूर्व कार्यामुळे इकॉनॉमिस्ट या प्रसिद्ध नियतकालिकांकडून त्यांना जगातील पहिल्या आठ तरुण अर्थशास्त्रज्ञांमध्ये स्थान देण्यात आले; तर २०१० मध्ये टाइम्स या प्रसिद्ध नियतकालिकांकडून जगातील पहिल्या शंभर प्रतिभाशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला.