"एस्थर डुफ्लो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १३:
तत्कालीन अमेरिकन [[अध्यक्ष]] बराक ओबामा यांच्या आर्थिक सल्लागार, अर्थमंत्र्याचे सल्लागार म्हणून डुफ्लो यांनी काम केले आहे. तसेच अमेरिकन अर्थतज्ज्ञ प्रा. जेफरे साच्स यांच्या मार्गदर्शनाखाली [[संशोधन]] साहाय्यक म्हणूनही त्यांनी काम केले. या अनुभवातून त्यांना अर्थशास्त्राच्या माध्यमातून जागतिक पातळीवर उपयुक्त व भरीव कामगिरी करावी ही प्रेरणा मिळाली.
 
पुढे त्यांनी पॅरिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (त्या वेळच्या डेल्टा) या संस्थेतून पदव्यूत्तर [[शिक्षण]] पूर्ण केले (१९९५). त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील ‘एमआयटी’मधून अर्थशास्त्र विषयातील डॉक्टरेट ही पदवी मिळवली (१९९९). अभिजित बॅनर्जी व अर्थतज्ज्ञ जोशूया ॲग्रॅस्टि हे त्यांचे मार्गदर्शक होते. ‘एमआयटी’मध्ये त्या अर्थशास्त्राच्या कायमस्वरुपी नियक्ती लाभलेल्या (टेन्यूअर) सहयोगी प्राध्यापक झाल्या. २०१५ मध्ये अभिजित बॅनर्जी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन मुले आहेत.
 
जगातील गरीब लोक कसे पिचले जातात, देशांचे आर्थिक धोरण त्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी कसे साहाय्यक ठरू शकते या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी डुफ्लो यांनी सुमारे वीस वर्षे खर्च केली. गरीबांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी सामाजिक व आर्थिक धोरणे कशी कारणीभूत होतात, हा त्यांच्या अभ्यासाचा प्रमुख विषय आहे.