"कोरटकर, सुहासिनी रामराव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २४:
* स्वर-साधना समितीतर्फे स्वर-साधना रत्न, इत्यादी.
 
सुहासिनीताईंनी भेंडीबाजार घराण्याचे वैभव आपल्या गायकीतून समर्थपणे साकारले. त्यांच्या गानसेवेमुळे भेंडीबाजार त्याकाळी हे काहीसे दुर्लक्षित राहिलेले घराणे पुन्हा संगीताच्या प्रवाहात आले. या घराण्याची दुर्मीळ झालेली गायकी तीन तपांच्या निरंतर प्रयत्नांनी पुन्हा प्रस्थापित करून ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय करण्याचे महत्त्वाचे काम सुहासिनीताईंनी केले. त्यांनी पं. [[त्र्यंबकराव जानोरीकर|जानोरीकरांच्या]] स्मृतिप्रीत्यर्थ युवा [[गायक]]-गायिका यांना प्रोत्साहन देण्यासाठी [[पुरस्कार]] सुरू केला आणि त्याची रक्कम (देणगी स्वरूपात) गानवर्धन या संगीत प्रचार-प्रसार संस्थेकडे सुपूर्त केली.
 
गायिका, संगीतज्ञ, बंदिशकार, लेखिका आणि गुरू आदी विविध पैलूंचा समुच्चय असलेल्या सुहासिनीताईंचे पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले. त्या अविवाहित होत्या.