"मोनालिसा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४:
 
 
मोनालिसा हे एक जगप्रसिद्ध [[चित्र]]. इटालियन प्रबोधनकालीन श्रेष्ठ [[चित्रकार]] ⇨ [[लिओनार्दो दा विंची|लिओनार्दो]] दा व्हींची (१४५२–१५१९) याने १५०३ ते १५०५ या कालावधीत हे व्यक्तिचित्र फ्लॉरेन्स येथे रंगविले. ते ला जोकोन्दा या नावानेही ओळखले जाते. या व्यक्तिचित्रासाठी बैठक देणारी स्त्री (जन्म १४७९) ही फ्रांचेस्को देल जोकोन्दो या फ्लॉरेन्समधील व्यापाऱ्याची [[पत्‍नी|पत्नी]] (विवाह १४९५) होती व तत्कालीन कलासमीक्षक व्हाझारीच्या मतानुसार, जोकोन्दोनेच आपल्या पत्नीचे व्यक्तिचित्र रंगविण्याचे काम [[लिओनार्दो दा विंची|लिओनार्दो]]<nowiki/>कडे सोपविले. कलेच्या इतिहासातील हे एक अजोड व आदर्श व्यक्तिचित्र मानले जाते. त्याने व्यक्तिचित्रणाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. चित्रातील स्त्रीच्या चेहऱ्यावर जे गूढ, खोल, अथांग भाव दर्शविले आहेत, त्याने लक्षावधी रसिकांना मोहात व संभ्रमात पाडले. त्यायोगे काळाच्या ओघात उत्तरोत्तर चित्राविषयीचे आकर्षण व लोकप्रियता वाढतच गेली आहे. विशेषतः मोनालिसाच्या चेहऱ्यावरचे गूढ मंदस्मित, डोळ्यात लपलेली किंचित खिन्नतेची झाक व पार्श्वभूमीदाखलचे काल्पनिक [[निसर्ग]]<nowiki/>दृश्य हे घटक चित्राच्या गूढतेत अधिक भरच घालतात.
 
]
ओळ ११:
 
मोनालिसाचा आदर्श पुढे ठेवून अनेक व्यक्तिचित्रे नंतरच्या काळात रंगविली गेली. त्याच्या तंतोतंत प्रतिकृती, नग्नाकृती, तसेच व्यंग्यचित्रेही रंगवली गेली. प्रबोधनकालीन कलासौंदर्याचे निकष धुडकावून लावण्यासाठी, प्रसिद्ध दादावादी चित्रकार मार्सेल द्यूशाँ याने मोनालिसाला दाढीमिशा लावून या चित्राचे विरुपण केले व ते L. H. O. O. Q (१९१९) या नावाने प्रदर्शित केले.
 
लिओनार्दोच्या काळात हे चित्र त्याच्याकडून पहिल्या फ्रान्सिसने विकत घेतले. नंतर ते पॅरिसच्या लूव्ह्‌र
 
[[वर्ग:लिओनार्दो दा विंची]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मोनालिसा" पासून हुडकले