बदलांचा आढावा नाही
No edit summary |
No edit summary |
||
१९९६ मध्ये त्यांनी आकाशवाणीच्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि उर्वरित [[जीवन]] संगीताच्या प्रचार-प्रसार कार्याला वाहून घेतले. [[स्वर]], लय व [[शब्द]] यांचा त्रिवेणी संगम असलेल्या शंभरहून अधिक बंदिशी ‘निगुनी’ या टोपणनावाने बांधणाऱ्या वाग्येयकार म्हणून सुहासिनींचे कार्य अलौकिक स्वरूपात संगीतकारांसमोर आले.
अभिजात संगीताची आवड समाजातील सर्व स्तरांमध्ये निर्माण व्हावी म्हणून त्यांनी विविध नावीन्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती केली. रसाळ निवेदनासह विषयाची प्रात्यक्षिकांसह साकल्याने मांडणी हे त्यांच्या कार्यक्रमांचे वैशिष्ट्य होते. [[हिंदी भाषा|हिंदी]]-मराठी गीतांवर आधारित ‘दिल चाहे सो गाओ’, उपशास्त्रीय संगीताची ओळख करून देणारा ‘ठुमरी ते कजरी’, स्वरचित बंदिशींवर आधारित ‘शब्द-स्वरांचे लेणे’, विविध ऋतूंमधील रागांवर आणि गीतावर आधारित ‘ऋतुरंग’, शास्त्रीय संगीताचे [[सौंदर्य]] उलगडणारा ख्याल गायनाचा ‘रसास्वाद’ ही त्यातील काही उदाहरणे होत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांतून त्याचे संगीतविषयक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचा संगीतकार म्हणून आकाशवाणी व दूरदर्शन कार्यक्रमात सहभाग असे.
|