"कोरटकर, सुहासिनी रामराव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
आपल्या सुरेल गुंजन आणि मिंडयुक्त आलापींनी रागाचे यथार्थ, सुडौल आणि परिणामकारक रूप त्या रसिकांसमोर साकारत. बंदिशींचे आकर्षक प्रस्तुतीकरण, लयीत गुंफलेली, [[सरगम]] आणि गमकयुक्त ताना ही त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये होत. त्यांनी शास्त्रीय संगीताबरोबर ठुमरी, दादरा, [[नाट्यसंगीत]], अभंग या [[उपशास्त्रीय संगीत|उपशास्त्रीय संगीता]]<nowiki/>चाही सराव केला. बेगम अख्तर यांच्या गायनाच्या ढंगाचा [[अभ्यास]] करून स्वत:ची एक खास शैली त्यांनी बनविली.
 
दिल्लीच्या सुप्रसिद्ध ठुमरी गायिका नैनादेवी यांच्याकडून त्यांनी ठुमरीचे मार्गदर्शन घेतले. हिंदी व मराठी अभंग, गीत, [[गझल]] त्यांनी संगीतबद्ध केल्या. संगीताच्या तालमींबरोबरच त्यांनी गांधर्व [[महाविद्यालय|महाविद्यालया]]<nowiki/>ची संगीत अलंकार परीक्षा दिली व त्या संपूर्ण देशामध्ये द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या (१९६६). केंद्रीय विद्यालयात १९६८ पासून संगीत शिक्षिका म्हणून त्यांनी अध्यापन केले. त्याच्या वडिलांच्या निधनाच्या (१९६८) धक्क्यातून सावरून त्यांनी संगीताचार्य ही पदवी संपादन केली. दरम्यान युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या परीक्षेमध्ये त्या उत्तीर्ण झाल्या आणि त्यांची पुणे आकाशवाणी केंद्रावर कार्यक्रम अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. या नोकरीच्या कार्यकाळात त्यांना [[औरंगाबाद]], पणजी, दिल्ली येथेही आकाशवाणीच्या कामानिमित्त जावे लागले.
३६४

संपादने