"कोरटकर, सुहासिनी रामराव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
No edit summary
ओळ ३:
त्यामुळे सुहासिनीताईंचे सुरुवातीचे शिक्षण बंगलोर, मुंबई व [[पुणे]] येथे झाले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी [[अर्थशास्त्र]] विषयातून पदवी घेतली (१९६१). पुढे काही वर्षांनी त्यांनी ‘संगीताचे आध्यात्मिक महत्त्व’ या विषयावर प्रबंध सादर करून ‘संगीताचार्य’ ही संगीतातील सर्वोच्च पदवी संपादन केली (१९६८).
 
सुहासिनीताईंच्या वडिलांना [[शास्त्रीय संगीत|शास्त्रीय संगीता]]<nowiki/>ची आवड होती आणि त्यांच्या [[आई]] सरलाताई हार्मोनियम व व्हायोलिन वादन आणि गायन शिकल्या होत्या. सुहासिनीताईंचा आवाज सुरेल व त्यांना लय-तालाची जाण चांगली होती. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना संगीताचे शिक्षण घेण्याकरिता घरातून प्रोत्साहन मिळाले. पुण्यात आल्यानंतर भेंडीबाजार घराण्याचे संगीतज्ञ व गुरू पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्याकडून त्यांना संगीताची शिस्तबद्ध तालीम मिळाली.
 
गुरुंचे उत्तम मार्गदर्शन आणि स्वत:ची निरंतर साधना-रियाज यांच्या आधारे या घराण्याची वैशिष्ट्यपूर्ण गायकी त्यातील बारकाव्यांसहित त्या शिकू लागल्या, यांदरम्यान सुहासिनीताईंची प्रकृती बिघडली आणि त्यांची फुफ्फुसे नाजूक असल्याने त्यांना हा रियाज झेपणार नाही असे निदान झाले, तरीही निश्चयपूर्वक त्यांनी ह्या घराण्याची गायकी आत्मसात केली.