"हिरडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६६:
 
==औषधी उपयोग==
हिरड्यात [[गोड]], [[आंबट]], [[कडू]], [[तिखट]], [[तुरट]] हे पाच [[चव|रस]] आहेत. फक्त [[खारट]] रस नाही. यातील गोड, तिखट आणि तुरट रसांमुळे [[पित्त]] दोषाचा नाश होतो. कडू, तिखट आणि तुरट रसांमुळे [[कफ]] दोष दूर होतो. तर गोड आणि आंबट या रसांमुळे [[वात]] दोष दूर होतो.
 
हिरड्याचे लघु आणि रुक्ष असे गुण आहेत. लघु म्हणजे ज्या योगाने शरीरात हलकेपणा निर्माण होतो, उत्साह येतो. सामान्यत: लघु गुणाच्या द्रव्यांनी शरीरातील वाढलेला कफदोष कमी होतो. शरीरात ज्या ज्या ठिकाणी मलाची निर्मिती होते त्या त्या ठिकाणी या गुणाच्या औषधांचा प्रभाव होतो, हिरड्याची फळे मल दोष दूर करतात. रुक्ष म्हणजे शरीरात रूक्षपणा, कठीणपणा येतो. या गुणामुळे शरीरातील वात दोषाचे प्रमाण वाढते, कफ दोषाचे प्रमाण कमी होते. [[मधुमेह]] सारख्या रोगात याचा खूप उपयोग होतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/हिरडा" पासून हुडकले