"महार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १९:
 
== इतिहास ==
 
महार हा गावाचा हरकाम्या होता. तो ओरडून दवंडी देई, प्रेताचे सरण वाही. जागल्या म्हणजे पहारेकरी हा बहुधा महार जातीचा होता. गावराखण करणाऱ्या महाराला चारही सीमा बारकाईने माहित म्हणून जमीन जुमला, घरदार या स्थावरांच्या वादांत त्याची साक्ष महत्त्वाची असायची. वेसकर या महाराने वेशीचे दरवाजे रात्री बंद करून सकाळी उघडायचे.
 
महार या जातीचे लोक संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आढळतात. १९११ साली या जातीच्या लोकांची संख्या सुमारे ३३ लाख होती. [[आर्य]] लोक भारतात येण्यापूर्वी या देशात ज्या मूळ जाती होत्या त्यांपैकी एक महारांची जात असावी असे एक मत आहे. राजारामशास्त्री भागवतांनी हे महार म्हणजे प्राचीन नाग होत असे मत दिले आहे. डॉ. भांडारकरांच्या मते मेलेल्या जनावरांना वाहून नेणारे (मृत + हार) ते महार होतात. महा + अरि म्हणजे मोठे शत्रू ते महार अशी काही विद्वानांनी उपपत्ती लावली आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/महार" पासून हुडकले