"शिकेकाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''शिकेकाई''' ही [[भारत|भारतात]] उगवणारी एक [[आयुर्वेद|आयुर्वेदिक]] औषधी वनस्पती आहे.याच्या शेंगा कुटुन डोक्यास लावतात.
बाभूळ, खैर व हिवर इत्यादींशी शिकेकाई समवंशी असल्याने त्यांच्या अनेक शारीरिक लक्षणांत सारखेपणा आढळतो. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव अ‍ॅकेशिया रुगेटा हे आहे.ह्या वनस्पतींच्या अ‍ॅकेशिया ह्या प्रजातीतील एकूण ७०० जातींपैकी भारतात फक्त सु. २५ आढळतात. शिकेकाईचे खोड जाडजूड असून फांद्यांवर लहान पांढरट ठिपके व टोकास वाकडे लहान काटे असतात. पाने एकाआड एक, संयुक्त व पिसासारखी असून मध्यशिरेवर बारीक वाकडे काटे व देठाच्या मध्यभागी खालच्या बाजूस ग्रंथी असतात. दलांच्या ४-८ जोड्या व दलकांच्या १०-२० जोड्या असतात. फुले गोलसर झुपक्यात येतात. ती लहान व पिवळी असून मार्च ते मे महिन्यांमध्ये येतात. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे लेग्युमिनोजी कुलात (अथवा शिंबावंत कुलात) व मिमोजॉइडी अथवा शिरीष उपकुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. शुष्क फळ (शेंग) चपटे, जाड, ७·५-१२·५ X २-२·८ सेंमी., लालसर पिंगट, सुरकुतलेले व काहीसे गाठाळ असते. बिया ६-१०, काळ्या व गुळगुळीत असून फळे तडकून त्या बाहेर पडतात.
 
==उपयोग==
"https://mr.wikipedia.org/wiki/शिकेकाई" पासून हुडकले