"मधुमेह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२३ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
(→‎प्रकार २: दुरुस्ती)
मधुमेहाचे नेमके कारण (किंवा कारणे) अज्ञात आहे. आनुवंशिक आणि जीवनशैली अशा दोन्ही कारणाने मधुमेह होत असावा. यावर झालेल्या संशोधनातून मधुमेही व्यक्तीमध्ये [[जनुक|जनुकीय]] खुणा असाव्यात असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. प्रथम प्रकारच्या मधुमेहामध्ये शरीराची प्रतिकार यंत्रणा विषाणू किंवा जीवाणूच्या प्रतिकारासाठी कार्यान्वित होऊन स्वतःच्या स्वादुपिंड पेशी नष्ट झाल्या असल्याची शक्यता अधिक. दुसर्‍या प्रकारच्या मधुमेहामध्ये कौटुंबिक इतिहास आणि स्थूलपणा, यांचा सहभाग असावा.
 
दुसर्‍या प्रकारच्या मधुमेहामध्ये, काही रुग्णांमधे स्वादुपिंडामध्ये पुरेसे इन्शुलिन तयार होते. पण पेशी शरीरातील इन्शुलिनला प्रतिसाद देत नाहीत. कदाचित तयार झालेल्या इन्शुलिनचा परिणाम होत नाही. मधुमेह झाला असल्याची जाणीव दुसर्‍या प्रकारच्या मधुमेहीमध्ये लगोलग होत नाही. कंटाळा, तीव्र तहान आणि मूत्र विसर्जनाचे प्रमाण वाढणे ही मधुमेहाची प्राथमिक लक्षणे आहेत. इतर लक्षणांमध्ये एकाएकी होणारी वजनातील घट, जखमा बर्‍या होण्यास लागणारा वेळ, मूत्रमार्गाचा संसर्ग, हिरड्यांचे विकार, किंवा दृष्टी अंधुक दृष्टीहोत जाणे ही आहेत. अन्य तक्रारींसाठी डॉक्टरकडे गेल्यानंतर दुसर्‍या प्रकारचा मधुमेह उघडकीस आल्याची असंख्य उदाहरणे आहेत.
 
दुसर्‍या प्रकारचा मधुमेह होण्याची अधिक शक्यता खालील व्यक्तीमध्ये आहे-
३९,०३०

संपादने