"मूळव्याध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎पूर्वरूप: दुवा जोडला
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
→‎उपचार: दुवा जोडला
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ८५:
* रक्तस्राव असल्यास [[निरंजन]]चे फळ आणून ते पाउण पेला पाण्यात रात्री भिजू घालावे.सकाळी ते फळ त्याच पाण्यात कुस्करुन ते पाणी प्यावे.असे दोन्ही वेळेस करावे.(सकाळी व रात्री)
* [[इसबगोल]]चा भुसा आणून त्यात पाणी घालून रात्री भिजत ठेवावे व सकाळी ते गाळून प्यावे.
* कागदी लिंबू कापून ५ ग्रॅम काथ बारीक वाटून त्या अर्ध्या-अर्ध्या कापलेल्या लिंबावर लावावा व रात्र भर तसाच ठेवावा , सकाळी दोन्ही तुकडे चोखावे. रक्तस्राव बंद करण्यासाठी हे उत्तम औषध आहे, १५ दिवस दररोज हा उपाय करावा.
* उपचार पद्धतीत शस्त्रक्रिया हा शेवटचा उपाय असतो.
* झेंडूची १० पाने आणि ३ ग्रॅम काळी मिरी पाण्यात वाटून गाळून प्यायल्याने मुळव्याध मधून रक्त येणे थांबते.
* आल्याची एक गाठ वाटून एक कप पाण्यात उकळावी, एक चतुर्थाश पाणी उरल्यावर चूलीवरून उतरून थंड करावे, त्यात एक चमचा साखर घालून रोज सकाळी प्यायल्याने मूळव्याध बरे होतात.
* एक ग्लास मुळयाचा रस काढून त्यात शुद्ध तुपातली जिलेबी ( १०० ग्रॅम ) टाकून तासभर झाकून ठेवावे, नंतर जिलबी खात – खात मुळयाचा रस पिऊन टाकावा. ८-१० दिवस हा प्रयोग केल्याने मूळव्याध बरे होतात. 
* महानिंब बीयांचे चूर्ण बनवून सकाळ – सायंकाळ जेवणाच्या अर्धा तास आधी साध्या पाण्याबरोबर ३ ग्रॅम चूर्ण घेतल्यास विशेष फायदा होतो .
* कायाकल्प तेलात किंवा जात्यादि तेलात सूती कपडा / कापूस तेलात भिजवून रात्री गुदा मार्गाच्या आत ठेवावा. 
* नारळाच्या शेंड्या ( भुया ) जाळून राख बनवून चाळून घ्यावी . नारळाचे हे भस्म तीन – तीन ग्रॅम सकाळी , दुपारी उपाशी पोटी ताकाबरोबर आणि सायंकाळी कोमट पाण्याबरोबर घ्यावे . एकदाच घेतल्याने मूळव्याधीत अपेक्षित फायदा होतो . 
* रुईचा चिक व हळद यांच्या मिश्रणाचा १ ठिबका रोज रात्री मूळव्यधावर लावावा.
 
शुष्कार्श आणि रक्त मूळव्याधीचे अचूक औषध :-
* देशी कापूर १००-२०० मिग्रॅ ( हरब-याच्या डाळिच्या १ दाण्या एवढा ) त्याला केळाच्या एका तुकड्यात ठेवून उपाशी पोटी गिळावे. एका घेण्यातच रक्तस्त्राव बंद होतो .
रक्तस्त्राव न थांबल्यास उपरोक्त प्रयोग तीन दिवसांपर्यंत दिवसातून तीन वेळा करू शकता. हा प्रयोग यापेक्षा जास्त वेळा करू नये . ( हा प्रयोग संपल्यानंतर केळे खाणे निषिद्ध आहे . ) 
* गायीच्या सहज पिता येईल अशा १ कप कोमट दूधात अर्ध्या लिंबाचा रस पिळून दूध फाटण्या पूर्वीच त्वरीत प्यावे . हा प्रयोग रक्त मूळव्याधजन्य रक्तस्त्रावाला त्वरीत बंद करतो . उपरोक्त प्रयोग एक किंवा दोन वेळेपेक्षा जास्त वेळा करू नये . आवश्यकता असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा . 
 
वरील कुठलाही उपाय करतांना त्याबरोबर ओवा, जंगली ओवा, आणि खुरासानी ओवा तिघांना बारीक चूर्ण करून थोडयाश्या लोण्यात कालवून सकाळ – संध्याकाळ पाइल्स फोडांवर लावावे. अर्धा चमचा हस्तिदंता चे चूर्ण अग्नित जाळून त्याचा धूर पाइल्स वर घेतल्यास पाइल्स मधे आराम येतो. जर वरील उपायांनी आराम पडत नसेल तर चिकित्सकांकडून इलाज करणे आवश्यक ठरेल.
 
मूळव्याध रोगासाठी योगाभ्यास:-
मण्डूकासन , शशकासन , गोमुखासन , वक्रासन , योगमुद्रासन , पवनमुक्तासन , पादांगुष्ठनासास्पर्शासन , उत्तानपादासन , नौकासन , कंधरासन , सर्व प्राणायाम व विशेषतः मूलबंधाचा अभ्यास करावा . 
 
मूळव्याधाचे आधुनिक चिकित्सा पर्याय:-
मूळव्याधासाठी औषध-ग़ोळ्या-मलम,
मूळव्याध जर प्रथम व व्दितीय अवस्थेत असेल तर ते औषध-ग़ोळ्या-मलमा व्दारे बरे होऊ शकते.
यासाठी आपले डॉक्टर खालिल प्रकारे औषधे देतात.
१) वेदनाशामक गोळ्या / Pain Killer
२) पोट साफ होण्याची औषधे / Laxative
३) अ‍ॅन्टिबॉयोटिक्स / Antibiotics
४)मूळव्याधाचा आकार कमी करण्यासाठीची गोळ्या
५) मलम / Cream for Piles- 
वेदनाशामक‌+मूळव्याधाचा आकार कमी करण्यासाठीची औषधे+अन्टिबॉयोटिक्स+सुज कमी करणारे 
अशा सर्व घटकांना एकत्र करुन तयार केलेला मलम दिला जातो.
मलम शौच्याला जायच्या आधी व शौच्याला जाऊन आल्यानंतर मूळव्याधावर लावतात.
 
बिनटाक्याच्या व विना-चिरफाड मूळव्याध उपचार पद्धती :-
या मध्ये प्रामुख्याने खालील ४ उपचार पद्धतींचा समावेश होतो
 
मूळव्याधाचे इंजेक्शन, Injection treatement ( Sclerotherapy) for Piles in Marathi:-
मूळव्याध प्रथम अवस्थेत (लहान कोंब) असल्यास मूळव्याधीच्या कोम्बांच्या मुळाशी फिनॉल व बदामाच्या तेलाच्या किंवा Aluminum Potassium Sulphate and Tannic acid मिश्रणाचे इंजेक्शन दिले जाते, दिड-दिड महिण्यांच्या अंतराने ३ वेळा अशा प्रकारचे इंजेक्शन देतात. या उपचारानंतर गरम पाण्याचा शेक घेणे, संडास साफ होण्याकरिता औषधे, वेदनाशामक औषधे, अंन्टिबॉयोटिक्स घेणे गरजेचे असते. ह्या उपचारानंतर काही वर्षांनी मुळव्याध पुन्हा उत्पन्न होऊ शकते. हि बिनटाक्याची व विनाचिरफाड मुळव्याध उपचार पद्धती आहे
 
रिंग बँडिंग (रिंग टाकणे), Rubber-Band Ligation for Piles in Marathi :-
व्दितीय अवस्थेतील मूळव्याध (थोडा मोठा कोंब) असल्यास मुळव्याधाच्या मुळावर बँड (रिंग) लावून मुळव्याधाच्या कोंबाचा रक्तप्रवाह बंद केला जातो. यामुळे काही दिवसांत कोंब बारिक होतो, सुकतो, कुजतो आणि लावलेल्या रिंगसह गळून बाहेर पडतो. 
रिंग बँडिंग (रिंग टाकणे), Rubber-Band Ligation for Piles in Marathi
एकाच वेळी केवळ दोनच कोंबांवर बँड (रिंग) लावून उपचार करता येतात. ही प्रक्रिया सोपी असून रुग्ण उपचारानंतर त्याच दिवशी घरी जाऊ शकतो. उपचारानंतर संडास साफ होण्याकरिता औषधे, वेदनाशामक औषधे, अंन्टिबॉयोटिक्स घेणे गरजेचे असते. हि बिनटाक्याच्या व विनाचिरफाड मूळव्याध उपचार पद्धती आहे
 
क्रोयोसर्जरी Cryosurgery for Pile in Marathi :-
अती थंड अश्या लिक्विड नायट्रोजनद्वारे मूळव्याधाचा कोंब गोठवला जातो. हा कोंब नंतर गळून जातो. 
आजकाल हि शस्त्रक्रिया खुप कमी प्रामाणात प्रचलित आहे, कारण या उपचारा नंतर गोठविलेल्या कोंबातून बरेच दिवस स्राव होत राहतो तसेच खुप दिवस वेदनाही होतात. उपचारानंतर गरम पाण्याचा शेक घेणे, संडास साफ होण्याकरिता औषधे, वेदनाशामक औषधे, अंन्टिबॉयोटिक्स घेणे गरजेचे असते. हि बिनटाक्याच्या व विनाचिरफाड मूळव्याध उपचार पद्धती आहे
 
इन्फ्रारेड फोटोकोऑगुलेशन, Infrared Coagulation for Piles in Marathi :-
या उपचार पद्धतीत इंफ्रारेड किरणांचा वापर केला जातो, हि किरणे मूळव्याधावर सोडली जातात, त्यामुळे उष्णता निर्मान होते, मुळव्याध जळून नष्ट होते. गुदद्वाराच्या आतील बाजुच्या मूळव्याध कोंबाच्या उपचारा साठीच या उपचार पद्धतिचा वापर केला जातो. उपचारानंतर गरम पाण्याचा शेक घेणे, संडास साफ होण्याकरिता औषधे, वेदनाशामक औषधे, अंन्टिबॉयोटिक्स घेणे गरजेचे असते. मुळव्याद पुन्हा निर्माण होण्याचा प्रमाण या उपचारात कमी असतो. हि बिनटाक्याच्या व विनाचिरफाड मूळव्याध उपचार पद्धती आहे
 
ऑपरेशन व्दारे मूळव्याध कापूण काढून टाकणे, Piles Operation (Haemorrhoidectomy) in Marathi :-
तृतीय किंवा चतुर्थ अवस्थेतील मूळव्याधासाठी (कोंब मोठे असल्यास, गुदद्वाराच्या बाहेर येत असल्यास किंवा खूप जुनाट असल्यास) या पद्धतीच्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो. 
या पद्धतीत भूल देऊन मूळव्याधीचे कोंब कापूण टाकतात. 
या पद्धतीच्या शस्त्रक्रिये नंतर रुग्णाला ३-५ दिवसापर्यंत रुग्णालयात भर्ति व्हावे लागते.
शस्त्रक्रियेनंतर दिड ते दोन आठवडे ड्रेसिंग करावी लागते.
तसेच गरम पाण्याचा शेक घेणे, संडास साफ होण्याकरिता औषधे, वेदनाशामक औषधे, अंन्टिबॉयोटिक्स घेणे गरजेचे असते.
 
लेझर द्वारे ऑपरेशन, Laser Surgery for Piles in Marathi:-
लेसर किरणांचा मूळव्याधावर मारा केला जातो, लेसर किरणांच्या संम्पर्कात आल्यामुळे मूळव्याध जळून नष्ट होते. सध्या हिच उपचार पद्धती जास्ती प्रचलित आहे, यामध्ये कोणतीही चिरफाड केली जात नाही, तसेच टाकाही घेतला जात नाही.
यामध्ये कमीत-कमी रक्तस्राव होतो. तसेच उपचारा नंतर रुग्ण त्याच दिवशी घरी जाऊ शकतो. १-२ दिवसांच्या आरामानंतर रुग्ण त्याची दैनंदिन कामे सुरू करू शकतो.
या पद्धतीत गुदाच्या रिंग ला अजिबात इजा होत नाही, त्यामुळे इतर मुळव्याधाच्या ऑपरेशन नंतर शौचाचा कंट्रोल जाण्याची भिती राहत नाही.
लेझर सर्जरी हि नवीन ऑपरेशन ची पद्धत, मूळव्याधाच्या रूग्णासाठी एक वरदानच आहे, या ऑपरेशन नंतर त्या मूळव्यधाच्या जागी पुन्हा मुळव्याध होत नाही.
 
* उपचार पद्धतीत शस्त्रक्रिया हा शेवटचा उपाय असतो.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मूळव्याध" पासून हुडकले