"रेणू दांडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
Wrote more about the work done by Mrs. Renu Dandekar in the field of education
ओळ १:
सौ. रेणू राजाराम दांडेकर या एक मराठी लेखिका, शिक्षणतज्ज्ञ व समाजसेविका आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील [[चिखलगाव]] नावाच्या गावात रेणू दांडेकर आणि त्यांचे पती राजाभाऊ दांडेकर हे अनेक वर्षे कौशल्यपूर्ण, प्रकल्पाधारित शिक्षणातून उत्तम विद्यार्थी घडवीत आले आहेत.
 
ग्रामविकासाचे स्वप्न घेऊन १९८२ साली एक तरुण जोडपं कोकणातील चिखलगाव सारख्या दुर्गम भागात आलं. ग्रामविकासाचा पाया म्हणून  शाळा सुरु केली. “कौशल्याधारित  शिक्षण ” हा जगणं समर्थ करणारा विचार घेऊन चिखलगाव आणि आजूबाजूच्या ४६ गावांमध्ये लोकसाधना काम करत आहे. शिक्षण, आरोग्य , शेती, मिहला सबलीकरण आणि सर्वांगीण  ग्रामविकास या पाच क्षेत्रात [https://loksadhana.org/ लोकसाधना] आज काम करत आहे.
 
डॉ. [[मुरलीधर गोडे]] आणि [[श्री.वा. नेर्लेकर]] यांनी संपादित केलेल्या [[श्यामची आई|'आजचा श्याम घडताना']] या पुस्तकात [[अच्युत गोडबोले]], डॉ. [[विकास आमटे]] आदींबरोबर रेणू दांडेकर यांचेही लेखन आहे.