"बायोगॅस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎उत्पादन: भर घातली
भर घातली
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. दृश्य संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १३:
 
बायोगॅसची निर्मिती ही वर नमूद केल्याप्रमाणे ऑक्सिजन विरहित वातावरणात होते. याकामी ॲनारोबिक जीवाणूंचा उपयोग होतो. [[गाय|गायी]] म्हशींच्या मोठ्या आतड्यात हे जीवाणू सहज आढळतात. त्यामुळेच गायी म्हशींचे शेण हे बायोगॅस प्रकल्प चालू करण्यास महत्त्वाचे मानले जाते. हे जीवाणू चार प्रकारचे असतात.
 
# मिझोफिलिक - हे जीवाणू ३२ ते ४०° सेल्सियस या तापमानात सर्वोत्तम काम करतात. कमी जास्त तापमान झाल्यास या जीवाणूंची कार्यक्षमता कमी होते.
# थर्मोफिलिक - हे जीवाणू ५५ ते ७०° सेल्सियस या तापमानात सर्वोत्तम काम करतात. कमी जास्त तापमान झाल्यास या जीवाणूंची कार्यक्षमता कमी होते.
 
=== बायोगॅससाठी जागा ===
बायोगॅस करण्यासाठी घराजवळील उंच, कोरडी, मोकळी व बराच वेळ सूर्यप्रकाश मिळणारी जागा निवडावी. जागा शक्‍यतो घराजवळ अगर गोठ्याजवळ असावी. जमिनीखाली पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा खाली असावी. निवडलेल्या जागेजवळ झाडे, पाण्याची विहीर, पाण्याचा हातपंप नसावा. बायोगॅस बांधकामास मंजुरी मिळाल्यानंतर आपल्याकडे असलेली जनावरे व कुटुंबातील व्यक्तींची संख्या विचारात घेऊन क्षमतानिहाय बायोगॅस संयंत्राचे आकारमान ठरवावे व बांधकाम करावे.
 
=== बायोगॅसचे प्रकार ===
केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या बायोगॅस मॉडेलचेच बांधकाम करावे. बांधकामावरून तरंगती गॅस टाकी संयंत्र आणि स्थिर घुमट संयंत्र असे दोन बायोगॅसचे प्रकार पडतात. स्थानिक जमीन व हवामानाचा प्रकार विचारात घेऊन त्याच्या बांधकामाचे नियोजन करावे. ज्या भागात मुरूम व तांबूस मातीचा प्रकार आहे, त्या ठिकाणी दीनबंधू स्थिर घुमट संयंत्र प्रकारचे बांधकाम करावे. ज्या ठिकाणी काळी माती अगर पाण्यामुळे जमीन फुगणारी आहे अशा ठिकाणी फेरोसिमेंट, प्री-फॅब्रिकेटेड फेरोसिमेंट या प्रकारचे बायोगॅस बांधावेत.
 
दीनबंधू स्थिर घुमट संयंत्र प्रकारचा बायोगॅस कमी खर्चात होणारा बायोगॅस आहे. तो सर्वसामान्य लाभार्थीस परवडणारा आहे, मात्र या संयंत्राचे बांधकाम प्रशिक्षित व कसबी गवंड्याकडूनच करून घ्यावे लागते. तरंगत्या टाकीचा बायोगॅस बांधकामास खर्च बराच येतो
 
=== '''बायोगॅस निर्मितीचे टप्पे''' ===
बायोगॅस निर्मिती ही तीन टप्प्यांत पार पडते. या प्रत्येक टप्प्यात वेगवेगळ्या प्रकारचे [[जीवाणू]] काम करतात.
* '''पहिला टप्पा''' - जैविक मालाचे साध्या सोप्या रेणूंमध्ये [[विघटन]]. या टप्प्यात साखरेचे, स्टार्चचे, प्रोटीन्सचे व जैविक मालात आढळणार्‍या विविध प्रकारच्या मोठ्यामोठ्या रेणूंचे लहान रेणूंमध्ये विघटन होते. हे लहान रेणू अमिनो ॲसिडचे, किंवा स्टार्चचे लहान [[रेणू]] इत्यांदींमध्ये बदलले जातात. हा टप्पा लवकर पार पडतो. या टप्प्यात जीवाणूंना बरीचशी उर्जा मिळते.
Line २३ ⟶ ३३:
CH<sub>3</sub>COOH=CH<sub>4</sub>+CO<sub>2</sub>[http://www.industrialgasplants.com/biogas-plant.html इंडस्ट्रियल बायोगॅस प्लांट]
 
=== '''बायोगॅस प्रकिया''' ===
<br />
सेंद्रिय पदार्थाचे जिवाणूद्वारे हवाविरहित अवस्थेत विघटनानंतर निर्माण होणारा वायू साठविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या साधनास बायोगॅस संयंत्र म्हणतात. यात मिथेन व कार्बन-डाय- ऑक्‍साईड हे वायू तयार होतात. मिथेन हा वायू ज्वलनास मदत करतो. बायोमास गॅसिफायरमधून तयार होणारा प्रोड्युसर गॅस पाणी उपसण्यासाठी, वीजनिर्मितीसाठी, तसेच स्वयंपाकासाठी देखील वापरला जातो. बायोमास गॅसिफायर संयंत्र विविध कार्यक्षमतेमध्ये उपलब्ध असून गरजेप्रमाणे त्यांचा वापर करता येतो.
 
बायोगॅस वायूमध्ये मिथेन 55 ते 70 टक्के, कार्बन-डाय- ऑक्‍साईड 30 ते 40 टक्के अल्प प्रमाणात नायट्रोजन व हायड्रोजन सल्फाईड या वायूंचा समावेश असतो. यातील मिथेन हा वायू ज्वलनशील आहे. कोणत्याही प्रकारचे टाकाऊ पदार्थ, जे कुजतात त्यांच्यापासून बायोगॅस तयार होतो. उदा. शेण, घरातील खरकटे अन्न, निरुपयोगी भाजीपाला, पशुविष्ठा, मानवी विष्ठा, इ. पदार्थांचे मिश्रण पाण्याबरोबर करून बायोगॅस संयंत्राच्या प्रवेश कक्षामध्ये पाचक यंत्रामध्ये सोडण्यात येते. पाचक यंत्रामध्ये कालांतराने कार्यक्षम जिवाणू तयार होतात व ऍसिटिक ऍसिड तयार होऊन पाच विभिन्न प्रकारचे जिवाणू तयार होऊन मिथेन व कार्बन-डाय- ऑक्‍साईड हे वायू तयार होतात. मिथेन हा वायू ज्वलनास मदत करतो व त्याचे उष्णता मूल्य 4700 किलो कॅलरी इ. असते.
 
बांधकामाचा खर्च संयंत्राच्या आकारावर अवलंबून आहे. दोन घनमीटर क्षमतेचा दीनबंधू प्रकाराचे संयंत्र बांधण्याचा खर्च 40-45 हजार रुपये येऊ शकतो.
 
तरंगती टाकीचे बायोगॅस (फ्लोरिंग डोम) संयंत्राला येणारा खर्चही त्याच्या आकारमानावर अवलंबून आहे. दोन घनमीटर क्षमतेचा खादी ग्रामोद्योग प्रकारच्या संयंत्रासाठी अंदाजित साधारणपणे 45-50 हजार रुपये खर्च होतो.
 
बायोगॅस संयंत्राची रचना करताना त्यामध्ये हवाबंद, बंदिस्त पोकळी तयार करावी लागते. त्या पोकळीत सेंद्रिय पदार्थ टाकण्याची सोय करावी लागते, तसेच सेंद्रिय पदार्थांपासून तयार होणारा गॅस व खत बाहेर येण्याची व साठविण्याची सोय करावी लागते.
 
== उत्पादन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बायोगॅस" पासून हुडकले