"हत्तीरोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ९:
== नैसर्गिक इतिहास ==
माणसांमध्‍ये लसिकाग्रंथिंच्‍या हत्‍तीरोगाचा प्रादुर्भाव गत ४००० वर्षापासून होत असावा,असे दिसून येते. सन १८६६ मध्‍ये लेविस, डिमार्क्यू आणि विचेरिया यांनी मायक्रोफायलेरिया व हत्‍तीरोगाचा परस्‍पर संबध असल्‍याचे स्पष्ट केले. सन १८७६ मध्‍ये जोसेफ बॅनक्रॉप्‍टी यांनी हत्‍तीरोगाचा पूर्ण वाढ झालेला जंतू शोधला. हत्तीरोग जंतूच्या जीवन चक्रासंदर्भात पॅटेट्रीक मॅन्‍सन आणि जॉर्ज कॉर्मिसेल यांचे संशोधन ही मोलाचे आहे.
 
== रोगकारक घटक ==
हत्‍तीरोगाचा प्रसार सुतासारखा दिसणा-या परोपजीवी कृमींमुळे होतो. भारतामध्‍ये ९८ टकके रुग्‍णांमध्‍ये हत्‍तीरोगाचा प्रसार बुचेरिया बॅनक्रॉप्‍टी या परोपजीवी कृमींमुळे झालेला आढळून येतो. भारतातील २५० जिल्‍हयांमध्‍ये स्‍थानिक स्‍वरुपात लागण झालेल्‍या हत्‍तीरोग रुग्‍णांची नोंद आहे. प्रौढ अवस्‍थेमध्‍ये हत्‍तीरोगाचे जंतू लसीका संस्‍थेच्‍या वाहिन्‍यांमध्‍ये राहतात.लसीका संस्‍था ही लसीका ग्रंथी आणि लसीका वाहिन्‍यांची बनलेली यंत्रणा असून ती शरीरातील रोगप्रतिकार शक्‍ती अबाधित ठेवण्याचे कार्य करते.
 
== लक्षणे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/हत्तीरोग" पासून हुडकले