"जीवाणू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
बदल केला
ओळ ६:
साधारणतः साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर सजीव सृष्टीची सुरुवात झाली असं वैज्ञानिकांचं मत आहे. तेव्हा पृथ्वीचा पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला होता. काही रासायनिक अभिक्रिया होऊन त्या पाण्यात जीवाणूंच्या रूपाने पेशी-पटलाने वेढलेला एक [[सूक्ष्मदर्शक|सूक्ष्म]] थेंब तयार झाला. जैविक [[उत्क्रांती]] पूर्वी घडलेल्या या घटनेला रासायनिक उत्क्रांती असं म्हटलं जातं.
 
हे '''जीवाणू''' [[ऑक्सीजन]]-विरहित वातावरणात होते. पृथ्वीवरील ऑक्सीजनचा मुख्य पुरवठा ज्या [[वनस्पती|वनस्पतीं]]<nowiki/>पासून होतो त्या तयार झालेल्या नव्हत्या म्हणून तेव्हा जे जीवाणू तयार झाले होते ते ऑक्सीजन विरहित [[वातावरण|वातावरणा]]<nowiki/>तील जीवाणू म्हणजे ऍनएरोबिक बॅक्टेरिया मानले जातात. अर्थातच ऑक्सीजनऑक्सिजन नसल्यामुळे पृथ्वीभोवती [[ओझोनचा पट्टा|ओझोनचे वलय]] नव्हते म्हणून भरपूर [[ऊर्जा|ऊर्जे]]<nowiki/>चं वहन करणारे [[अतिनील किरण]] म्हणजेच [[अल्ट्राव्हायोलेट]] रेज पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करीत. म्हणून तेव्हा पृथ्वीवरील वातावरण आजच्या सारखे नव्हते. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा तग धरणारे हे जीवाणू एक्स्ट्रीमोफिलिक मानले जातात. सर्वप्रथम तयार झालेले जीवाणू असल्यामुळे त्यांना आर्कीबॅक्टेरिया असे नाव दिले गेले.
 
[[वर्ग:जीवशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जीवाणू" पासून हुडकले