"शकुंतलादेवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
शकुंतलादेवी (जन्म : ४ नॊव्हेंबर १९२९; मृत्यू : २१ एप्रिल २०१३) हिला ह्यूमन काॅम्पूटर म्हणून ओळखले जाते.
 
४ नॊव्हेंबर १९२९ ला बंगलोरमध्ये शकुंतलादेवी यांचा जन्म झाला. त्यांच कुटुंब म्हणजे पारपारिक कन्नड ब्राह्मण .पण शकुंतला देवी यांचे वडील नव्या युगातले,त्यांनी आपल्या भिक्षुकीच्या पारंपारिक व्यवसायाला आणि मंदिरातील परंपरागत पुजारी होण्याला नकार देऊन सर्कस मधील आडवाटेवरची नोकरी धरली .
 
शकुंतलादेवीचे वडील सर्कसमध्ये काम करत होते. तीन वर्षाच्या शकुंतलाला पत्त्याचे खेळ शिकवताना तिच्या अफाट स्मरणशक्तीचे त्यांना ज्ञान झाले. त्यांनाच शकुंतलादेवीमधील झपाट्याने गुणाकार-भागाकार करण्याची शक्तीची पहिल्यांदा ओळख पटली. सर्कस सोडून ते शकुंतलाचेच रोडशो करू लागले. वयाच्या ६व्या वर्षी शकुंतलाने म्हैसूर विद्यापीठात आपल्या अंकगणितीय कौशल्याचे प्रदर्शन केले.
ओळ ११:
१८ जून १९८० मध्ये त्यांना ७६८६३६९७७४८७० आणि २४६५०९९७४५७७९ ह्या दोन संख्या गुणाकारासाठी देण्यात आल्या .हे आकडे लंडनच्या इम्पिरियल कॉलेजच्या संगणक विभागाने निवडले .त्यानंतर शकुंतला देवी यांनी या दोन आकड्यांचा अचूक गुणाकार करुन दाखवत केवळ २८ सेकंदामध्ये १८९४७६६८१७७९९५४२६४६२७७३७३० हे उत्तर दिल.विचार करा १३ आकडी दोन संख्यांचा गुणाकार त्यांनी फक्त २८ सेकंदात पूर्ण केला.त्यांच्या याच कामगिरीमुळे त्यांना '''ह्युमन कॉम्प्युटर''' म्हणून ओळखले जाऊ लागले आणि शकुंतला देवी याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये विराजमान झाल.
 
खरतर शकुंतलादेवी यांच्या अंगी एक अदभूत प्रतिभा होती की अख्ख्या भारतास त्याची दाखल घ्यावी लागली .चक्का गुगल ने त्यांच्या पहिल्या जयंतनिमित्त डुडल बनवुन त्यांना आदरांजली वाहिली होती.
 
भारतात परतल्यावर १९८८ मध्ये त्यांना अमेरिकेतून बर्कलेच्या कॅलीफोर्निया विद्यापीठामधील मानसशास्त्र विभागाचं विशेष आमंत्रण आलं.या विभागातील प्रा.आर्थर जेनसन यांनी त्यांच्यावर संशोधन करण्यास सुरुवात केली. प्रा.आर्थर जेनसन यांनी देखील त्यांच्यावर असंख्य प्रयोग केले.कोणत्याही अवघड बहुअंकी संख्येच घनमूळ काढणे किवा कोणत्याही बहुअंकी संख्येचा सातवा किवा आठवा घात काढायला सांगण्याची खोटी कि शकुंतला देवी याचं उत्तर हजर असायचं.
 
२०१३ सालच्या एप्रिल महिन्यात ,वयाच्या ८३ व्या वर्षी बंगलोरमध्ये शकुंतला देवी यांनी अखेरचा श्वास घेतला आणि हा जगप्रसिद्ध '''ह्युमन कॉम्प्युटर''' काळाच्या पडद्याआड झाला.