"पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २५:
}}
 
'''अहमदनगर जिल्हा''' हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा आहे. आजच्या परिस्थितीत अहमदनगर जिल्हा हा सर्वांत पुढारलेला आहे. [[शिर्डी]] येथील साईबाबा मंदिर याच जिल्ह्यात आहे ते [[राहाता तालुका]]त आहे. '''अहमदनगर''' जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांनी स्थापन केला होता. '[[राळेगण सिद्धी]]' अण्णा हजारे यांच्या आदर्श ग्राम या संकल्पनेतून राळेगण सिद्धी या खेड्याने जलव्यवस्थापनाचा एक आदर्श निर्माण केला, तर '[[हिवरे बाजार]]' पोपटराव पवार यांच्या संकल्पनेतून हिवरेबाजार हे आदर्श खेडे म्हणून नावारूपास आले आहे अहमदनगर या शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
 
अहमदनगर या शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
ह्या शहराचा इतिहास पाहिला असता, ह्या शहरात अनेक शहरे अशी आढळतात. ज्याचे वैशिष्ट्य त्याच्या नावातच दडले आहे, जसे कि पाथर्डी शहरात पार्थ म्हणजेच महाभारत कालीन अर्जुन रडल्याचे आढळते. त्यामुळे पाथर्डी असे पडले. तिसगाव हे छोटेसे गाव ह्या गावात तीस वेशी आढळतात म्हणुन तिसगाव हे नाव पडले. तसेच पाथर्डी तालुक्यातील 'मढी'
तसेच पाथर्डी तालुक्यातील 'मढी'
[[चित्र:Kanifnath temple madhi.jpg|इवलेसे]]
हे शहर 'कानिफनाथगड' म्हणून प्रसिद्ध आहे. नाथसम्प्रद्याचा पाया येथेच रचलेला आढळून येतो.
Line ३५ ⟶ ३४:
अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७,४१२ चौ.कि.मी. तर लोकसंख्या [[इ.स. २०११]]च्या जनगननुसार ४५,४३,०८० इतकी आहे. राज्याच्या मध्यभागी असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस [[नाशिक जिल्हा]] व औरंगाबाद जिल्हा; पूर्वेस [[बीड जिल्हा]] ; पूर्व व आग्नेय दिशांस [[उस्मानाबाद जिल्हा]]; दक्षिणेस [[सोलापूर जिल्हा]], तर नैर्ऋत्येस व पश्चिमेस [[पुणे जिल्हा]] व [[ठाणे जिल्हा]] हे जिल्हे वसलेले आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वांत मोठा असणाऱ्या या जिल्ह्याने राज्याचे ५.५४% भौगोलिक क्षेत्र व्यापलेले आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील प्रामुख्याने [[अकोले तालुका]] व [[संगमनेर तालुका|संगमनेर तालुक्यात]] [[सह्याद्री]]च्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत.
 
महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर [[कळसूबाई शिखर|कळसूबाई]] याच डोंगररांगांमध्ये [[अकोले तालुका|अकोले तालुक्यात]] आहे (नगर, [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्यांच्या]] सीमेवर) आहे. शिखराची समुद्रसपाटीपासून उंची १६४६ मीटर आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील प्रमुख डोंगररांग [[हरिश्चंद्राची रांग]] या नावाने ओळखली जाते. जिल्ह्याचा काही मध्य भाग व उत्तर भाग हा बाळेश्वराचे पठार या नावाने संबोधला जातो. तसेच जिल्ह्याचा दक्षिण भाग हा [[घोड नदी]], [[भीमा]] व [[सीना नदी|सीना]] या नद्यांचे खोरे म्हणून ओळखला जातो.
 
[[गोदावरी]], [[भीमा]], [[सीना नदी|सीना]], [[मुळा नदी (अहमदनगर जिल्हा)|मुळा]] व [[प्रवरा नदी|प्रवरा]] या अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून [[आढळा नदी|आढळा]], [[ढोरा]], [[घोड नदी]], कुकडी याही नद्या जिल्ह्यातून व जिल्ह्याच्या सीमा भागातून वाहतात. बहुतांशी नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. [[गोदावरी]] या महाराष्ट्रातील प्रमुख नदीची या जिल्ह्यातील लांबी सुमारे १५० कि.मी. आहे. प्रवरा व गोदावरी नद्यांचा संगम [[नेवासे तालुका|नेवासे]] तालुक्यात होतो, या स्थळाला [[प्रवरासंगम]] असे म्हटले जाते./आहे
 
[[अकोले तालुका|अकोले तालुक्यातील]] डोंगराळ भागात [[भंडारदरा धरण|भंडारदरा]] येथे [[प्रवरा नदी]]वर १९२६ मध्ये धरण बांधण्यात आले आहे. भारतातील जुन्या धरणांत याचा समावेश केला जातो./आहे
 
[[मुळा नदी (अहमदनगर जिल्हा)|मुळा नदी]]वर जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण [[राहुरी तालुका|राहुरी]] तालुक्यात बांधण्यात आले आहे. या प्रकल्पातून [[अहमदनगर]] शहराला पाणी पुरवठा केला जातो. येथील जलाशयास [[मुळा धरण|ज्ञानेश्वरसागर]] असे म्हटले जाते. अहमदनगर जिल्ह्यातील सिंचनात प्रामुख्याने विहिरींचा वाटा जास्त आहे.