"लिपी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहिती जोडली.
माहिती जोडली. संदर्भ जोडला.
ओळ ४:
वर्ण किंवा ध्वनी यांचे लेखन करण्यासाठी ज्या चिन्हांना उपयोग करतात, त्या चिन्हसमुहाला लिपी असे नाव आहे. एका चिन्हापासून जेव्हा एकाच ध्वनीचा बोध होतो, तेव्हा लिपीचा उद्देश सफल होतो.
 
आजची लिपी ही मानव बोलायला शिकल्यापासून हळूहळू परिणत झाली आहे. मानवाची संस्कृती जेवढी प्राचीन, तेवढीच लिपीही प्राचीन आहे.{{sfn|जोशी|१९७४}}
 
==लिपीचा उगम==
प्रारंभी मनुष्य आपले विचार साध्या उभ्या-आडव्या रेघोट्या काढून व्यक्त करीत असे. रेघोट्या मारता मारताच चित्रे काढण्याइतकी त्याची प्रगती झाली. त्या चित्रांतून तो आपला आशय व्यक्त करू लागला. [[सूर्य]], [[वृक्ष]], [[साप]], [[बकरी]] इ. चित्रांनी त्या त्या वस्तूंचा व प्राण्यांचा बोध होऊ लागला. प्राचीन गुहानिवासी माणसांनी कोरलेली चित्रे अलिकडे सापडली आहेत.{{sfn|जोशी|१९७४}}
 
प्राचीन काळी [[इजिप्त]] व [[मेसोपोटेमिया]] या देशांतही भावाची अभिव्यक्ती चित्रांच्या द्वारेच होत असे. पण इजिप्तमध्ये ही चित्रे प्रायः दगडांवर खोदीत आणि मेसापोटेमियात ती मातीच्या विटांवर खिळ्यांनी कोरीत. विटांचा पृष्ठभाग मऊ असल्याने त्यांवर केवळ रेघाच ओढता येत, गोलाकार काढता येत नसत. उदा. तीनचार रेघा ओढून विटांवर माशाचे चित्र काढीत. त्यामुळे आरंभापासूनच ही चित्रे संकेतात्मक झाली. याच संकेतात्मक चित्रांतून पुढे इराणी लोकांना अक्षरे बनविली. चित्रलिपी हा लिपीच्या विकासातील एक टप्पा होय.
 
वैदिक लोकांनी [[गणन]] व [[लेखन]] या बाबतीत बरीच प्रगती केली होती. भारतात प्रारंभी [[ब्राह्मी लिपी]]चा उपयोग केला जात असे. पण ती निश्चित केव्हा प्रचारात आली, ते सांगता येत नाही. मात्र ती सनपूर्व पाचव्या शतकात प्रचारात होती, एवढे निश्चित म्हणता येते.{{sfn|जोशी|१९७४}}
 
 
 
 
[[File:Cyrus cylinder extract.svg|thumb|ग्रेट सायरसची वंशावळ आणि त्याने बॅबिलोनच्या ताब्यात घेतल्याचा अहवाल इ.स.पू. ५३९, सायरस द सिलिंडर (ओळी १–-१२) वरून काढलेली.]]
 
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
==संदर्भसूची==
{{स्रोत पुस्तक
| पहिलेनाव = पं. महादेवशास्त्री
| आडनाव = जोशी
| लेखक =
| सहलेखक =
| शीर्षक = भारतीय संस्कृति कोश - आठवा खंड - राजस्थान ते विहार
| मालिका = भारतीय संस्कृति कोश
| प्रकरण = लिपी
| भाषा =
| संपादक = पं. महादेवशास्त्री जोशी
| प्रकाशक = भारतीय संस्कृति कोशमंडळ, पुणे
| आवृत्ती = प्रथम
| दिनांक =
| महिना =
| वर्ष = १९७४
| फॉरमॅट =
| अन्य =
| पृष्ठ = ३७५-३७६
| पृष्ठे =
| आयएसबीएन =
| दुवा =
| संदर्भ =
| अ‍ॅक्सेसदिनांक =
| अ‍ॅक्सेसमहिना =
| अ‍ॅक्सेसवर्ष =
| अवतरण = लिपी
}}
[[वर्ग:भाषा]]
[[वर्ग:लिप्या| ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/लिपी" पासून हुडकले