"प्रमोद कमलाकर माने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: प्रमोद माने हे मराठवाड्यातील, मराठी साहित्यातील महत्त्वाचे कवी,...
(काही फरक नाही)

२०:३६, १६ जानेवारी २०२० ची आवृत्ती

प्रमोद माने हे मराठवाड्यातील, मराठी साहित्यातील महत्त्वाचे कवी, कादंबरीकार. त्यांचा जन्म - ०५/०२/१९८१ मध्ये उमरगा येथे झाला. प्रमोद माने यांनी केवळ कविताच नव्हे तर कथा, ललित, कादंबरी या वाड्.मय प्रकारात ही लेखन करतात. त्यांच्या लेखनाचा मुख्यविषय वास्तव आणि शेती, शेतकऱ्याचे प्रश्न हा आहे. त्यांनी कोरडवाहू या ब्लाॅग लेखनातुन जागतिक महाजालावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.


शैक्षणिक माहिती

  • एम. ए. (मराठी) सेट, नेट, डी.एड.
  • प्राथमिक शिक्षक. - जि. प. प्रा. शाळा होळी, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद. येथे कार्यरत.
  • स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्याकडे डॉ. संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाने पाएच.डी.चे संशोधन ते करीत आहेत.

प्रकाशित साहित्य

  • 'कोरडवाहू' हा कवितासंग्रह २००५ साली प्रकाशित.

(प्रतिभास प्रकाशन, परभणी)

  • 'गावधूळ' आगामी कादंबरीचा अंश 'वाघूर' या दिवाळी अंकातून प्रकाशित.
  • एक कवितासंग्रह आणि ललित लेखसंग्रह प्रकाशनासाठी सिध्द.
  • विविध वाड्.मयीन नियत-अनियतकालिकांमधून कविता, कथा, ललितलेखन प्रकाशित.

पुरस्कार

  • महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबईचा 'यशवंतराव चव्हाण वाड्.मय पुरस्कार' प्राप्त.
  • स्व. बापूसाहेब ढोकरे राज्यस्तरीय काव्य पुरस्कार, अकोला.

इतर

  • साहित्य अकादमीकडून प्रवासवृत्ती जाहीर.
  • एका कवितेची आसक्त पुणे यांच्या 'रिंगण' या नाट्याविष्कारासाठी निवड व सादरीकरण.

आगामी पुस्तके

  • पेरणी नक्षत्रांची (कवितासंग्रह)
  • गावधूळ (कादंबरी)
  • चांदवेल (ललित लेखसंग्रह)