"बच्चू कडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३८:
 
== उपक्रम==
पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर बच्चुभाऊंनी आपली राजकीय ताकद वापरून सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न सोडवले. "आमदाराची राहुटी" हा उपक्रम राबवून त्यांनी तालुकास्तरावरील ४७ विविध विभागांच्या ३५ योजना राबविण्यासाठी पंधरा दिवसात अख्खा तालुका पिंजून काढला. प्रत्येक गावात मुक्काम करून गावातील लोकांना विविध कागदपत्रांचे जागच्या जागी वाटप केले.
 
बच्चू कडूंना "अपंगांचे मसीहा" म्हणून ओळखले जाते. अपंग बांधवांसाठीच्या सरकारच्या योजनांची अमलबजावणी व्हावी यासाठी त्यांनी वेळोवेळी विधीमंडळात आवाज उठवला. आंदोलने केली. प्रहार संघटना अपंग बांधवांच्या पाठीशी उभी केली.
 
रुग्णसेवा हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. रुग्णांच्या सेवेसाठी त्यांनी आपल्या गाड्या विकून त्यातून रुग्णवाहिका खरेदी केल्या. त्यांच्या प्रहार संघटनेच्या रुग्णसेवा समितीच्या दरमहा विदर्भातून रुग्णांना मुंबईला उपचारासाठी नेण्याचे काम केले जाते. मुख्यमंत्री सहायता निधीतून राज्यभरातील गोरगरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी ते दक्ष असतात. स्वतः त्यांनी रक्तदानाचे शतक पार केले आहे. मुंबईवरील आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांनी मुंबईच्या मनोरा या आमदार निवासात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
 
== अभिनव आंदोलने==
==मारहाण केल्यावरून अटक==
"https://mr.wikipedia.org/wiki/बच्चू_कडू" पासून हुडकले