"बच्चू कडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३३:
 
== राजकीय कारकीर्द==
कॉलेजमध्ये असताना मित्रांच्या मदतीने कॉलेजमधील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. यातूनच त्यांनी कॉलेज प्रतिनिधींच्या निवडणुकीत भाग घेतला आणि ते निवडून आले. हा त्यांच्या आयुष्यातील पहिला विजय होता. हळूहळू कॉलेजच्या बाहेरही त्यांची लोकप्रियता वाढू लागली. त्याचकाळात जिल्हा सहकारी बँकेने शेतकऱ्यांचे हप्ते थकल्याने त्यांचे ट्रॅक्टर जप्त केल्याच्या प्रकरणात बच्चू कडूंनी बँकेत "सुतळी ऍटमबॉम्ब" फोडून केलेल्या अभिनव आंदोलनानंतर त्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर परत मिळाले. या घटनेने परिसरात बच्चू कडूंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले. त्यांच्यावर शिवसेनाप्रमुख [[बाळासाहेब ठाकरे]] यांचा प्रभाव असल्याने त्यांनी [[शिवसेने]]त प्रवेश करुन आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला.
 
राजकारणात येताच बच्चू कडूंनी आपल्या गावातील ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. घरून मिळालेला सामाजिक कार्याचा वारसा आणि राजकीय ताकद या माध्यमातून त्यांनी समाजहिताची अनेक कामे केली. आपल्या गावासोबतच ते शेजारच्या गावातील लोकांच्याही .समस्याही सोडवू लागले. दरम्यान चांदूरबाजार पंचायत समिती निवडणुकीतही बच्चू कडू निवडून आले थेट सभापती पदावर काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यावेळी शौचालय योजनेतील एक मोठा भ्रष्टाचार त्यांनी उघडकीस आणल्याने राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न व्हायला लागले. अपंग बांधवांसाठीच्या सायकलींच्या त्यांच्या महत्वाकांक्षी प्रस्तावाबाबत कुरघोडीचे राजकारण झाले. त्यानंतर स्थानिक नेत्यांशी मतभेद झाल्याने त्यांनी [[शिवसेना]] सोडली. अपंग, रुग्ण, विधवा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी त्यांनी प्रहार संघटना काढली. १९९९ साली विधानसभा निवडणुकीत अचलपूर मतदारसंघातून त्यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला. लोकसभा निवडणुकीतही ते थोडक्यात पराभूत झाले. त्यानंतर पाच त्यांनी पाच वर्षे अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले, आंदोलने केली. त्या जोरावर २००४ च्या विधानसभा निवडणुकीत [[बच्चू कडू]] प्रचंड मतांनी विजयी झाले. परंतु आपली संघटना राजकारणासाठी नसून समाजकारणाची आहे असा आदेश त्यांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना दिला आणि आपले समाजसेवेचे व्रत चालू ठेवले. २००४ नंतर २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग चार वेळा अपक्ष आमदार म्हणून ते निवडून आले. २०१९ साली लोकसभा निवडणुकीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या विधवा पत्नीला उमेदवारी देऊन त्यांनी या गंभीर विषयाकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे.
 
== उपक्रम==
== अभिनव आंदोलने==
"https://mr.wikipedia.org/wiki/बच्चू_कडू" पासून हुडकले