"एकपात्री नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५:
मराठी नाटक आणि एकपात्री प्रयोग या दोघांत मूलभूत फरक आहे. एकपात्रीत एकच कलाकार रंगमंचावर असतो. तो अभिनय, आवाज, हालचाली यातून आपली कला पेश करतो. पु. ल. देशपांडे यांची ‘बटाट्याची चाळ’ किंवा ‘असा मी असामी’, मधुकर टिल्लू यांचा 'प्रसंग लहान, विनोद महान' किंवा 'हसायदान',' जिंदादिल - मराठी शेरोशायरी', सुमन धर्माधिकारी यांची ‘घार हिंडते आकाशी’, वि. र. गोडे यांचे ‘अंतरीच्या नाना कळा’ तसेच सदानंद जोशी यांचे ‘मी अत्रे बोलतोय...’ याची दर्जेदार परंपरा लाभली आहे. प्रा. लक्ष्मण देशपांडे यांचे ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’, राम नगरकर यांचे ‘रामनगरी’, लालन सारंग यांचे ‘मी आणि माझ्या भूमिका’, शिरीष कणेकर यांची ‘माझी फिल्लमबाजी’, ‘फटकेबाजी’, ‘कणेकरी’, सुषमा देशपांडे यांची ‘व्हय मी सावित्रीबाई’, वसंत पोतदार यांचे ‘योद्धा सन्यासी’, सदानंद चांदेकर ' हसरी उठाठेव ' यांनीही एकपात्रीच्या दालनात वैभव निर्माण केले.
 
[[दिलीप प्रभावळकर]] या अष्टपैलू अभिनेत्यानेही ‘माझ्या भूमिका’, ‘मुखवटे आणि चेहरे’, या एकपात्रीतून ही कला शिखरापर्यंत पोहोचविली. विश्‍वास मेहेंदळे, मकरंद टिल्लू, रोहिणी हट्टंगडी, सुलभा देशपांडे, कै. भक्ती बर्वे,व्यंगचित्रकार विकास सबनीस, श्रीकांत मोघे, विसूभाऊ बापट, अंजली कीर्तने, प्रा. प्रवीण दवणे, सुधीर गाडगीळ,बंडा जोशी, संजय मोने, सुरेश परांजपे , राहुल भालेराव असे मराठी एकपात्री कलाकार आज आहेत.
 
एक सलग कथा नसतानाही आयुष्यातील विनोदी प्रसंगाची गुंफण करून एकपात्री सादर करण्याच्या पद्धतीचे स्व. मधुकर टिल्लू (प्रसंग लहान, विनोद महान:१९६१) हे जनक आहेत. राशी, भविष्य यावर भाष्य करणारे शरद उपाध्ये यांचे राशीचक्र, डॉ. रविराज अहिरराव यांचे ‘वास्तुविराज’, विवेक मेहेत्रे याचे ‘राशीवर्ष’ यांनीही हाऊसफुल्ल प्रयोगांचे विक्रम रंगभूमीवर केले आहेत. एकूणच एकपात्री प्रयोगांचे अनेक विषय, आशय आहेत. त्यात संवाद, गप्पागोष्टी, किस्से,काव्य, मार्गदर्शन, नाट्य हे आहे.राहुल विनायक भालेराव यांनी १९९५ ते २००२ या कालावधीत ११ राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धांचे विजेतेपद मिळवले .स्वानुभवावर आधारीत
" श्री हसोबा प्रसन्न " या एकपात्रीचे १५० हून अधिक प्रयोग त्यांनी केले आहेत .
 
दिलीप खन्ना यांच्या ‘हास्यदरबार’नेही रंगभूमीवर विक्रमी प्रयोग केलेत. दोन घटका मस्त करमणूक ते करतात. व्यंगचित्रकार संजय मिस्त्री हे व्यंगचित्रांच्या आधारे रसिकांना हसवितात.. संतोष चोरडिया ‘कॉमेडी चॅनल’ रंगवतात. त्यात ते धापा टाकत पळणार्‍या माणसाची नक्कल करतात. प्रकाश पारखी हे कोंबडी, घोडागाडी, शेतावरल्या मोटेचा आवाज, पक्ष्यांचे आवाज पेश करतात.
 
२००१ साली स्व. [[मधुकर टिल्लू]] यांच्या स्मृती निमित्त पुण्यात एकपात्री कलाकार एकत्र आले व त्यातून एकपात्री कलाकार संघ स्थापन झाला. नंतर त्यातूनच ' एकपात्री कलाकार परिषदेची' स्थापना झाली. २००६साली एकपात्री कलाकार परिषदेच्या [[मकरंद टिल्लू]] यांच्या पुढाकाराने नाट्यसंमेलनात प्रथमच एकपात्री कलाकारांची दखल घेतली गेली. संमेलनाध्यक्ष मोहन जोशींनी 'एकपात्री महोत्सव' आयोजित करून एकपात्रीला व्यासपीठ मिळवून दिले. 'एकपात्री कलाकार परिषद' संस्थेचे २००७ सालापर्यंत ३५ कलाकार सभासद झाले होते.एकपात्री कलाकार परिषद संस्थे तर्फे पन्नास हून अधिक एकपात्री महोत्सव सादर झाले आहेत . त्याच वर्षी दिलीप खन्ना यांनी 'एकपात्री कलाकार' संघटना स्थापन केला. महाराष्ट्र राज्यभर विखुरलेल्या कलाकारांना एकत्र करण्यासाठी त्यांनी संघटनेबरोबरच 'एकपात्री कलाकार' नावाची वेबसाईटही सुरू केली होती. कणकवलीच्या नाट्यसंमेलनात तिचे उद्‌घाटन करण्यात आले.
 
वर्षातून एकदा, बहुधा २१ एप्रिलला, अनेक एकपात्री कलाकार एकत्र येऊन ’आम्ही एकपात्री’ संघटनेचा वर्धापन दिन साजरा करतात. [[बंडा जोशी]] या संस्थेचे अध्यक्ष आहेत.