"मुद्रण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोठा मजकुर वगळला ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ९:
==तंत्र==
* छपाई मध्ये जे छापायचे आहे त्याची प्रतिमा प्रथम एका (बहुधा सपाट) माध्यमावर घेतात. नंतर ते माध्यम छपाई यंत्रावर लावून त्यावर शाईचा रूळ फिरवला जातो. रुळावरील शाई ही माध्यमापासून काहीशी उंच पातळीवर असल्याने ती प्रतिमेला लागते. ही शाई लागलेली प्रतिमा कागदावर दाबली जाते. त्यावरून कागद किंवा इतर गोष्टींवर छपाई होते. छपाईच्या वापरातील माध्यमे म्हणजे ब्लॉक्स, टाइप, ऑफसेट प्लेट्स, दगड, स्क्रीन इत्यादी. माध्यमामुळे छपाईचे तीन प्रकार पडतात.
पहिल्या प्रकारात प्रतिमा त्या माध्यमातल्या कोऱ्या भागापेक्षा वर आलेली म्हणजे उंच पातळीवर असते. या छपाई प्रकाराला रिलीफ छपाई म्हणतात. यात खिळे वापरून छपाई करणारे लेटर प्रेस आणि फ्लेक्सोग्राफी हे आता कालबाह्य झालेले प्रकार येतात.
 
* छपाईच्या दुसऱ्या प्रकारात प्रतिमा ही कोऱ्या भागाच्या पातळीतच असते. याला रिसेस किंवा सरफेस छपाई म्हणतात. यात लिथोग्राफी, ऑफसेट छपाई, स्क्रीन द्वारे छपाई वगरे प्रकार येतात. ऑफसेट छपाईमध्ये शाई माध्यमावरून जाते म्हणजेच ऑफसेट होते म्हणून त्यास ऑफसेट छपाई असे म्हंटले जाते.
 
* तिसऱ्या छपाई प्रकाराला इंटाग्लिओ छपाई म्हणतात. यात ग्रेव्ह्युअर पद्धतीने छपाई होते. यातली प्रतिमा कोऱ्या भागापेक्षा खोलगट भागात असते. कागद व अन्य पदार्थावरील छपाई केलेला भाग याला प्रतिमा असलेला भाग म्हणतात. छपाई एका विशिष्ट शाईचा वापर करून केलेली असते.
 
छपाईतील प्रतिमा, शाईचे असंख्य लहान लहान ठिपके अथवा बिंदू जवळ जवळ येऊन तयार होते. हे बिंदू किती दाट अथवा विरळ असतात त्यावर छपाईमधील कमीजास्त तपशील,भडकपणा किंवा फिकेपणा ठरतो.
उदाहरणार्थ एक सेंमी लांब आणि एक सेंमी. रुंद चौरसात छपाईचे सर्व बिंदू एकमेकाला खेटून आणि भरगच्च असतील तर तो चौकोन भडक दिसतो. या उलट बिंदू विरळ असतील तर ती छपाई फिकी दिसते. या भडक छपाईला लाईन छपाई तर नियंत्रितपणे विरळ छपाईला हाफ टोन छपाई म्हणतात. पुस्तके, वर्तमानपत्रे यातील शीर्षके आणि मुख्य मजकूर लाईन छपाईत येतात. छायाचित्रे आणि इतर सजावटीत हाफटोनचा उपयोग करतात. छायाचित्रांची छपाई नीट न्याहाळल्यानंतर त्यातली जाळीदार नक्षी लक्षात येईल. बिंदूंची घनता डॉट्स पर स्क्वेअर इंच (डीपीआय) अशा परिमाणात मोजतात.
 
== यांत्रिक छपाई ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मुद्रण" पासून हुडकले