"अश्विनी भिडे-देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎पूर्वायुष्य: माहितीत भर घातली.
माहितीत भर घातली.
ओळ ५१:
बंदिश आणि बंदिश रचना या विषयांचे भिडे-देशपांडे यांना सखोल ज्ञान आहे. त्यांनी स्वत: अनेक बंदिशी रचल्या आहेत. या रचना राग रचनांजली ( २००४) या पुस्तकामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. २०१० मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्याच्या पुढच्या भागात राग रचनांजली २ मध्ये आणखी ९८ बंदिशी आहेत.
 
भिडे-देशपांडे यांनी जगभरातील अनेक संगीत संमेलनांमध्ये आणि मैफिलींमध्ये आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे. त्यामध्ये पुण्यातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, भुवनेश्वर, ओरिसा येथील राजा राणी महोत्सव, पुण्यातील गान सरस्वती महोत्सव यांचा समावेश आहे. त्या [[आकाशवाणी]] आणि [[दूरदर्शन|दूरदर्शनच्या]] टॉप ग्रेड गायिका आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय कार्यक्रम आणि आकाशवाणीच्या संगीत संमेलनामध्ये सहभाग घेतला आहे.
 
त्या अनेक शिष्यांना आपल्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायकीचे शिक्षण देत आहेत तसेच हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी त्या अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये शास्त्रीय संगीतावर व्याख्याने - प्रात्याक्षिके देतात.