"अश्विनी भिडे-देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ जोडला.
→‎पूर्वायुष्य: माहितीत भर घातली.
ओळ ४४:
 
== पूर्वायुष्य ==
शास्त्रीय गायिका माणिक भिडे आणि गोविंद भिडे हे अश्विनी भिडे यांचे आई-वडील. मुंबईमध्ये संगीताची परंपरा असलेल्या घराण्यात जन्मलेल्या भिडे यांचे शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण पंडित नारायणराव दातार यांच्याकडे झाले. त्यांनी गांधर्व महाविद्यालयातून ‘संगीत विशारद’ ही पदवी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी घेतली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://ashwinibhide.in/index_files/profile.htm|शीर्षक=Dr. Ashwini Bhide Deshpande Profile|संकेतस्थळ=ashwinibhide.in|अॅक्सेसदिनांक=2020-01-07}}</ref> तेव्हापासून त्या आपली आई  [[माणिक भिडे]] यांच्याकडून जयपूर-अत्रौली घराण्याची तालीम घेत आहेत. त्यांनी २००९ पर्यंत रत्नाकर पै यांच्याकडूनसुद्धा मागर्दर्शन घेतले. भिडे-देशपांडे यांनी सूक्ष्मजीवशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि [[मुंबई]] येथील [[भाभा अणुसंशोधन केंद्र|भाभा अणुसंशोधन]] केंद्रातून जैवरसायनशास्त्रात पीएच.डी. मिळवली आहे. डॉक्टरेट मिळवेपर्यंत भिडे-देशपांडे यांनी संगीतातील व्यावसायिक कारकीर्दीचा विचार केलेला नव्हता.  
 
== सांगीतिक कारकिर्द ==