"पावलो कोएलो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९४७ मधील जन्म टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ २:
'''पावलो कोएलो''' (जन्म २४ ऑगस्ट, १९४७) हे एक प्रसिद्ध [[ब्राझिल|ब्राझिलियन]] लेखक आणि गीतकार आहेत.
 
त्यांचा जन्म रियो दे जेनेरो, ब्राझील येथे झाला. ते जेसुइट शाळेत शिकले. कुमारवयात कोएलो यांना लेखक बनायचे होते. जेव्हा त्यांनी आपल्या आईला हे सांगितले तेव्हा त्या उत्तरल्या, " माझ्या बाळा, तुझे वडील एक अभियंता आहेत. ते तर्कशुद्ध आणि योग्य विचार करतात, व त्यांना या जगाची स्पष्ट ओळख आहे. लेखक बनणे म्हणजे नक्की काय हे तुला कळले आहे का?"
त्यावर कोएलो यांनी संशोधन केले आणि असा निष्कर्ष काढला की लेखक 'कायम चष्मा घालतो व कधीच केस विंचरत नाही' आणि 'स्वतःच्या पिढीला कधीही आपले विचार समजू न देणे ही त्याची जबाबदारी व त्याचे कर्तव्य असते'.
अवघ्या १६ वर्षांचे असताना कोएलोंच्या अबोलपणामुळे व पारंपारिक मार्गांना विरोध करण्यामुळे त्यांच्या पालकांनी त्यांना मानसिक रुग्णालयात दाखल केले होते. तिथल्या त्यांच्या वास्तव्यात ते तीन वेळा पळून गेले होते. ते २० वर्षांचे असताना त्यांना तिथून सोडण्यात आले. त्या काळाबद्दल कोएलो नंतर एकदा म्हणाले, "त्यांना मला इजा करायची नव्हती ,त्यांना फक्त काय करावे ते कळत नव्हते. त्यांनी तसे मला उध्वस्त करायला नव्हे तर मला वाचवायला केले होते."