"नाना फडणवीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
{{इतिहासलेखन}}
[[चित्र:Madhu Rao Narayan the Maratha Peshwa with Nana Fadnavis and attendants Poona 1792 by James Wales.jpg|thumb|right|180px|[[सवाई माधवराव पेशवे|सवाई माधवराव पेशव्यांसोबत]] बसलेले {{लेखनाव}} (चित्रकार: [[जेम्स वेल्स (चित्रकार)|जेम्स वेल्स]]; चित्रनिर्मिती: इ.स. १७९२ ;)]]
'''बाळाजी जनार्दन भानू''' ऊर्फ '''नाना फडणवीस''' ([[फेब्रुवारी १२]], [[इ.स. १७४२]]; [[सातारा]], [[महाराष्ट्र]] - [[मार्च १३]], [[इ.स. १८००]]; [[पुणे]], [[महाराष्ट्र]]) पेशव्यांच्या दरबारी असणारे [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्यातील]] मुत्सद्दी होते. नाना फडणवीस हे नुसतेच शहाणे होते, योद्धे नव्हते यास्तव पेशवाईतील [[साडेतीन शहाणे|साडेतीन शहाण्यांपैकी]] हेते अर्धे शहाणे समजले जात.
 
== जीवन ==
नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या [[रायगड जिल्हा| रायगड जिल्ह्यातील]] [[श्रीवर्धन]] येथील होते. त्यांचा जन्म [[फेब्रुवारी १२]], [[इ.स. १७४२]] रोजी [[सातारा]] येथे झाला. बालवयातच [[बाळाजी बाजीराव पेशवे|नानासाहेब पेशव्यांच्या]] सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या 20 व्या२०व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले.
 
आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच [[पेशवाई]] आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. [[इंग्लिश लोक|इंग्रजांचा]] पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले.
 
[[माधवराव पेशवे|थोरल्या माधवराव पेशव्यांच्या]] मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी [[महादजी शिंदे|महादजी शिंद्यांच्या]] मदतीने त्यांनी पुन्हा रूळावररुळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचंसत्तेचे वर्चस्व टिकवून ठेवले., [[पुणे|पुण्याचे]] वैभव वाढवले. [[सवाई माधवराव पेशवे|सवाई माधवराव पेशव्यांच्या]] अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. पुढे आजारपणात [[मार्च १३]], [[इ.स. १८००]] रोजी त्यांचा अंत झाला. [[वाई]] येथे नाना फडणीसांचा वाडा आजही आहे. पुण्यातही नानावाडा आहे.
 
==नाना फडणवीस यांच्या पत्‍न्याबायका{{संदर्भ हवा}}==
नाना फडणवीस यांची नऊ लग्ने झाली होती; शिवाय त्यांना दोन रखेल्या होत्या. नानांचे पहिले लग्न दहाव्या वर्षी झाले; या स्त्रीचे नाव यशोदाबाई. नानांच्या नऊ बायकांपैकी सात त्यांच्या हयातीत वारल्या; नाना वारले तेव्हा त्यांची आठवी पत्‍नी बगाबाई व नववी जिऊबाई या देवसेवेसाठी सिद्धटेकला होत्या; त्यांना ही बातमी समजताच त्या पुण्यास येण्यास निघाल्या. वाटेत त्यांना ताब्यांत घेण्यासाठी पेशव्यांनी फौज पाठविली. परंतु तिला या बायकांच्या सोबत असलेल्या अरबांनी हुसकावून दिले, असे मॅक्डोनल्ड म्हणतो. या स्त्रिया पुण्यास आल्यावर बगाबाई नानांच्या पश्चात चौदा दिवसांनी वारली. जिऊबाईचे वय यावेळी नऊ वर्षांचे होते. तिने नानांनी अर्धवट ठेवलेले भीमाशंकराचे देऊळ बांधून पुरे केले.
 
Line २१ ⟶ २०:
 
इंग्रजी राज्य झाल्यावर एलफिन्स्टनने बाईस पुण्यास आणून वार्षिक हजारांची नेमणूक कायम करून, बेलबाग संस्थान व मेणवली गाव जप्तीतून मोकळे केले. नंतर बाई मेणवलीस जाऊन राहिली. तिने इ.स. १८२७ मध्ये मिरजेच्या गंगाधरराव भानू नावाच्या मुलास इंग्रजांच्या संमतीने दत्तक घेऊन त्याचे नाव माधवराव ठेविले व त्यास आपली बारा हजारांची नेमणूक, बेलबाग संस्थान व मेणवलीची वहिवाट मिळावी म्हणून फार खटपट केली; परंतु इंग्रजांनी तिचे काही एक ऐकले नाही. अखेर इसवी सन १८५४ च्या मार्चमध्ये जिऊबाई वारली. ती शहाणी व सदाचरणी असून तिने अखेरपर्यंत नानांचे नांव निष्कलंक राखिले. बाई वारल्यावर तिची नेमणूक इंग्रजांनी बंद केली.
 
==नाना फडणवीस यांचे गुप्तहेर खाते==
अखबारनवीसांची (बातम्या आणणाऱ्यांची) प्रथा मराठ्यांच्या राज्यात अगोदरपासूनच होती. मराठी सत्तेचा हिंदुस्थानभर राज्यविस्तार झाल्यावर अखबारनवीसही प्रांताप्रांतांत ठिकठिकाणी नेमले गेले.. प्रसिद्ध पानिपतच्या युद्धकाळात "बातम्या" वेळेवर न मिळाल्याने मराठ्यांचे फार मोठे नुकसान झाले.
 
नाना फडणीस यांनी पानिपत प्रत्यक्षात पाहिले होते. बहुदा यातूनच धडा घेऊन मराठेशाहीतील मुत्सद्दी नाना फडणीस यांनी त्यांच्या कारकिर्दीत अखबारनवीस आणि नजरबाज यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविली. या कारणामुळे नानांना हिंदुस्थानातीलच नाही तर परदेशातीलही बातम्या अत्यंत जलद कळत असत.
 
प्रत्येक ठिकाणच्या "आतल्या" बातम्या मिळविण्यासाठी नानांनी अतिशोधक आणि भेदतत्पर माणसे मिळविली होती. गायकवाड नामक एक मराठा सरदार नानांचा अत्यंत विश्वासातील पटाईत बातमीदार होता. निंबाजी माणकोजी नामक अखबारनवीस निजामाच्या दरबारातील खडान् खडा बातमी नानांना कळवीत असे.
 
कुणबिणी, आचारी, दासी, खोजे, सेवेकरी, दर्जी, विधवा स्त्रिया, न्हावी, ब्राह्मण, पागेदार, सरदार, तेलंग, गोसावी असे कित्येक बातमीदार नानांनी नेमले होते. यांना "नजरबाज" असे म्हणत. हे नजरबाज इतके तेज होते की कित्येकांच्या रोजकीर्दीच्या नोंदीही ते नानांना पाठवत असत. या गुप्तहेरांच्या बारीकसारीक माहितीमुळे नानांना शत्रू, प्रतिपक्षातील मोठे अधिकारी, बडे सरदार, धनिक, पेढीवाले, स्वकीय सरदार दरकदार यांची इत्थंभूत मासलेवाईक माहिती असे.
 
मद्रास येथील इंग्रजांची बातमी काढण्याकरिता नानांनी हैदराबादचे वकील गोविंदराव काळे यांजमार्फत 'व्यंकटराम पिल्ले' नावाचा एक मद्रासी इसम ठेवला होता. तो इंग्रजी जाणत असल्यामुळे त्याचकडून इंग्रजांचे घरातील विलायतेची बातमी मिळेल असी नानांस आशा होती. त्यास पगार दरमहा शंभर रुपये द्यावा अशी गोविंदरावाने नानांस शिफारस केली होती.
 
वासुदेवशास्त्री खरे नानांविषयी म्हणतात...
 
"त्यांच्या बातमीचा पल्ला फार दूरवर असून त्यांस बातमी जलद कळत असे. इंग्रज व फ्रेंच यांशी मराठी राज्याशी जसजसा संबंध अधिकाधिक जडू लागला तसतशी नानांस कलकत्ता, मद्रास, मुंबई, पांडिचेरी, माही इत्यादी ठिकाणांहून बारीकसारीक बातमी देखील कळू लागली. हिंदुस्थानबाहेर देखील फ्रेंचाच्या व इंग्रजांच्या काय काय चळवळी चालल्या आहेत इकडे नानांचे लक्ष असे.
'फ्रेंचांचा सरदार बुशी हा फ्रान्स देशाहून फौज घेऊन माॅरिशस बेटात आला..'
'युरोपात फ्रेंच, डच, पोर्तुगीज हे इंग्रजांवर उठले आहेत..'
असली वर्तमाने त्यांना कळत."
 
म्हणूनच नाना फडणीसांना मराठेशाहीतील शहाणपण असे म्हणत.
 
== हेही पाहा ==