"कबीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सुधारणा
→‎जीवन: संदर्भ घातला
ओळ १:
[[चित्र:Kabir004.jpg|right|thumb|250px|कबीर]]
 
कबीर हे उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून प्रसिद्ध आहेत.संत कबीर यांचा जन्म कधी झाला याबद्दल एकमत दिसून येत नाही. कोणी ते इ.स. ११४९ मध्ये जन्माला आले असे मानतात तर कुणी १३९९ मध्ये जन्माला आले असे म्हणतात.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा|last=जोशी ,होडारकर|first=महादेवशास्त्री, पद्मजा|publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ प्रकाशन|year=२००९ पुनर्मुद्रण|isbn=|location=पुणे|pages=८०}}</ref>
 
==जीवन==
 
ज्येष्ठ पौर्णिमेस एका ब्राह्मण विधवेच्या पोटी एक पुत्र जन्मला पण उजळ माथ्याने त्याचे पालनपोषण करणे शक्य नाही म्हणून तिने काशीतील एका सरोवराच्या ( लहरतारा ) काठी त्याला टाकून दिले. कर्मधर्म संयोगाने काशीतल्या एका मुस्लिम जोडप्याला तो सापडतो.  त्या मुस्लिम जोडप्यांचे नाव निरू व निमा असते. त्यांनी त्या मुलाचे चांगले पालनपोषण केले आणि पुढे हाच मुलगा कबीर या नावाने प्रसिद्ध झाला.
कबीर जरी मुस्लिम कुटूंबात रहात होते तरी ते रामाचे उपासक होते. संत कबीर यांच्या बद्दलची कोणतीही ठाम महिती नाही पण असे म्हणतात की त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पत्नीचे नाव लोई असे होते व त्यांना एक कमाल नावाचा मुलगा आणि कमाली नावाची एक मुलगी होती.कबीर हे काशीत विणकर म्हणून काम करत होते. ते आयुष्यभर काशीमध्येच राहिले पण त्यांचा मृत्यू काशीत नसून मगहर येथे झाला, हे स्वतःच त्यांनी सांगितले आहे.<ref name=":0" />
 
"सकल जनम शिवपुरी गंवाया।
"https://mr.wikipedia.org/wiki/कबीर" पासून हुडकले